शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मी घट्ट आहे, काळजी करू नका-: धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:34 IST

अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले

ठळक मुद्देराष्टवादीची परिवर्तन यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन

कोल्हापूर : अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राष्टवादीची परिवर्तन यात्रा सोमवारी (दि.२८) कोल्हापुरात येत आहे. तिच्या तयारीसाठी मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. सभेसाठी माणसे आणण्यापासून दसरा चौकातील नियोजन आपण करतो, असे खासदार महाडिक यांनी सांगितले; पण ‘शहरातील होर्डिंग्जची जबाबदारीही आपण घ्या,’ असा चिमटा ए. वाय. पाटील यांनी काढला. यावर ‘अध्यक्षसाहेब, काळजी करू नका; मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी टाका, मी पेलतो,’ असा टोला महाडिक यांनी हाणला. सोमवारी (दि. २८) होणाऱ्या सभेच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश संपूर्ण राज्यात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही महाडिक यांनी केले.

ए. वाय. पाटील म्हणाले, भाजपला सामान्य माणूस कंटाळला आहे. हे सरकार उलथवून लावल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कोल्हापुरातील दोन्ही खासदार कशाही परिस्थितीत निवडून आणणारच, अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी.

शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ए. वाय. पाटील यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. महापौर सरिता मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, नेताजी पाटील, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर, सुनील देसाई, आदी उपस्थित होते.लाटकर, फरास ताकदीची माणसेसभेसाठी शहरातून किती माणसे आणणार याची माहिती आर. के. पोवार यांनी दिली; पण राजेश लाटकर व आदिल फरास कोठे आहेत, ती ताकदीची माणसे असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. 

गर्दी वाढणार‘भीमा कृषी’ प्रदर्शनाला येण्याचे आवाहन करत महाडिक म्हणाले, गेल्यावेळेला नऊ कोटींचा एक रेडा होता; त्यामुळे दोन लाखांनी गर्दी वाढली. आता दोन रेडे आणि बैल आणल्याने गर्दी दुप्पट होईल.‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल धनंजय महाडिक यांचा मंगळवारी ए. वाय. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयकुमार शिंदे, आर. के. पोवार, महापौर सरिता मोरे, अनिल साळोखे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण