शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर सर्व्हे, तीन महिलांसह पाचजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 11:40 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्व्हे करणाऱ्या तीन महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची भाजप महिलाध्यक्ष, गांधीनगर लिहिलेली कारही पोलिसांनी जप्त केली. या सर्वांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देमतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर सर्व्हे, तीन महिलांसह पाचजण ताब्यातकदमवाडी परिसरातील सुसंस्कार शाळेच्या आवारातील प्रकार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्व्हे करणाऱ्या तीन महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची भाजप महिलाध्यक्ष, गांधीनगर लिहिलेली कारही पोलिसांनी जप्त केली. या सर्वांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित गांधीनगर येथील प्राजक्ता जीवन चौधरी (वय ३३), सुप्रिया संजय व्हटकर (४३), वर्षाराणी जालिंदर गायकवाड (३०, तिघी रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संग्राम दिलीप पोवार (२२, कोयना कॉलनी, पोवारनगर), अमोल उमाशंकर बारड (३०, रा. केदारनगर, मोरेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीसाठी कदमवाडी परिसरातील सुसंस्कार शाळेमध्ये मतदान केंद्र होते.

पोलिसांनी जप्त केलेली कार.

मंगळवारी सकाळपासून लोक मतदानासाठी येत होते. साडेनऊच्या सुमारास गांधीनगर भाजप अध्यक्षा लिहिलेली कार (एमएच ०९ डीए ८३३०) मधून प्राजक्ता चौधरी, सुप्रिया व्हटकर, वर्षाराणी गायकवाड, संग्राम पोवार, अमोल बारड असे पाचजण आले. ते मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये कार नेऊन, मतदानासाठी जाणाऱ्या लोकांना अडवून आमचा सर्व्हे सुरू असून ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ असे प्रश्न विचारू लागले.

लोकांना काय सांगायचे तेच कळेना. लोकांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन येथील निवडणूक अधिकाऱ्यांना ‘बाहेर आम्हाला मतदान कोणाला करणार,’ म्हणून विचारणा होत आहे. कदाचित पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार केली. येथील अधिकाऱ्यांनी भरारी पथकासह शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. दोन्ही पथकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व्हे करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी निवडणूक अधिकारी गौतम विठ्ठल निकाळजे (वय ५०, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.पोलिसांच्या सतर्कतेने हानी टळलीकदमवाडी परिसरात मतदान केंद्राबाहेर कारमधून आलेल्या तीन महिला व दोन तरुण मतदारांवर दबाव टाकत पैसे वाटप करीत असल्याचे वृत्त परिसरात समजताच स्थानिक लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी धाव घेतली. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित पाचजणांसह कार पोलीस ठाण्यात आणली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पोलीस पोहोचण्यास थोडा जरी वेळ झाला असता तर जमावाने पाचजणांना मारहाण करून कारची तोडफोड केली असती. पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठी हानी टळली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapur-pcकोल्हापूर