शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

 कृषी अधिक्षकांनी तीन दुकानदारांचे सात दिवसाठी केले निलंबन; अवैध खतविक्री करणाऱ्यांना चाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 11:12 IST

व्यापाऱ्यांच्या या  दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली .    

ठळक मुद्देलिकिंग व जादा दराने खते विकण्याचा परिणाम तर खत विक्री केंद्र मालकांचे धाबे दणाणले आहेत .

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड -:  लॉकडाउनचा फायदा उठवून शेतकऱ्यांना जादा दराने खत विक्री करण्याबरोबरच लिंकिंग चा भुर्दंड गळयात घालण्याचे प्रकार खत विक्री केंद्र मालकांकडून वाढत आहेत. या विषयावर गेले तीन चार दिवस लोकमतने पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणली . त्याचा परीणाम म्हणून आज जिल्हा कृषी अधिक्षकांनी राधानगरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद व एका संघाच्या शाखेवर सात दिवसाच्या निलंबनाचे आदेश काढले . त्यामुळे अवैध खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच चाप बसला असून अवैद्य खतविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .

         लॉकडाऊनच्या संधीचा फायदा उठवून तालुक्यातील बहुतांशी खतविक्री केंद्रावर छुप्या पध्दतीने अवैद्य खतविक्री, सक्तीने लिंकिंग घेण्याचा हट्ट व जादा दराने खतविक्रीचे करण्याच्या प्रकारात वाढ होत होती . शेतकरी ही नाईलाजाने या व्यापाऱ्यांकडून ज्यादा दराने खत घेत होत . व्यापाऱ्यांच्या या  दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली .

      राधानगरीचे तालुका कृषी अधिकारी पी .बी. माने व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुजीत शिंदे यांनी सदर दुकानदारांची चौकशी करुन त्यांचा कडील खताचास्टॉक व रजीस्टर अद्ययात आहेत का याची खात्री करून आपला गोपणीय अहवाल जिल्हा कृषी अधिक्षकांकडे पाठवला . त्यावर आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  ज्ञानदेव वाकुरे यांनी निर्णय घेत . तालुक्यातील राधानगरी तालुका शेतकरी संघ शाखा धामोड , कृष्णाई शेती सेवा केंद्र क॥ वाळवे व रेणूका शेती सेवा केंद्र सरवडे यांच्यावर सात दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली आहे . त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे . तर खत विक्री केंद्र मालकांचे धाबे दणाणले आहेत .

 

संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून या तिनही खत विक्री करणाऱ्या दुकानांवर सात दिवसाचे निलंबन केले आहे . या सात दिवसात त्यांना कोणतेही देवघेव व्यवहार करता येणार नाहीत . तसेच त्यांनी या सात दिवसात सर्व रेकॉर्ड अपडेट करून लेखी हमीपत्र दयावयाचे आहे .  

ज्ञानदेव वाकुरे; (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी