शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत तिसºया दिवशीही यंत्रमाग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:05 IST

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसºया दिवशी बुधवारी सभा घेण्यात आली. यामध्ये आज, गुरुवारी सकाळी भव्य फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली. तसेच सायंकाळी लिंबू चौकात सभा होणार आहे.सन २०१३ सालच्या मजुरीवाढीच्या करारानुसार यंत्रमाग कामगारांना सन २०१७ च्या महागाई भत्त्यानुसार मजुरीमध्ये वाढ द्यावी, त्याचबरोबर फरकाची रक्कमही द्यावी, या ...

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसºया दिवशी बुधवारी सभा घेण्यात आली. यामध्ये आज, गुरुवारी सकाळी भव्य फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली. तसेच सायंकाळी लिंबू चौकात सभा होणार आहे.सन २०१३ सालच्या मजुरीवाढीच्या करारानुसार यंत्रमाग कामगारांना सन २०१७ च्या महागाई भत्त्यानुसार मजुरीमध्ये वाढ द्यावी, त्याचबरोबर फरकाची रक्कमही द्यावी, या मागणीसाठी १ जानेवारीपासून येथील यंत्रमाग कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत अनेक वक्त्यांनी भाषणे केली. त्यामध्ये कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. किमान वेतन म्हणून अठरा हजार रुपये द्यावेत. ईएसआय योजना लागू करावी. यंत्रमाग कामगारांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनामार्फत दोन लाख रुपये खात्यावर वर्ग करावे, या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.यावेळी दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, परशराम आगम, धोंडिबा कुंभार, सदा मलाबादे, पार्वती जाधव, आदींची भाषणे झाली.नेटाने संपरेटण्याचा निर्णयकितीही दिवस लागले तरी यंत्रमाग कामगारांना ठरलेल्या करारानुसार मजुरीवाढ दिली जात नाही, तोपर्यंत सुरू केलेल्या बेमुदत बंदचे आंदोलन नेटाने रेटण्याचा निर्णय सभेमध्ये एकमताने घेण्यात आला. या निर्णयाला कामगा रांनीही जोरदार घोषणा देत पाठिंबा दर्शविला.