शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

शहर सुधारणाकर्त्याची कोल्हापुरातच उपेक्षा

By admin | Updated: September 5, 2016 00:34 IST

पालिकेला जे. पी. नाईक यांचा विसर : आज जयंती; स्मृती जपण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर ज्यांनी १९४३ ते १९४६ या कालावधीत कोल्हापूर शहरामध्ये सुधारणांचा झंझावात निर्माण केला, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण सन्मानित डॉ. जे. पी. नाईक यांचा मात्र कोल्हापूर महानगरपालिकेला विसर पडला आहे. शहरामधील तळी बुजवून विविध संस्थांना जागा देणारे, ताराबाई आणि सुभाष रोडची निर्मिती करणारे, गांधी मैदान, पद्माराजे गार्डन तयार करवून घेणारे; एवढेच नव्हे तर फुलेवाडीसारखे प्रशस्त खेडे वसविणारे नाईक मात्र करवीरनगरीत उपेक्षित राहिले आहेत. आयुष्यभर ज्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ध्यास घेऊन काम केले, ज्यांची या क्षेत्रातील श्रेष्ठता ‘युनेस्को’नेही मान्य केली, त्या डॉ. जे. पी. नाईक यांची आज, ५ सप्टेंबर ही जयंती. मात्र या दिवशी अपवादात्मक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होते किंवा त्यांना अभिवादन केले जाते. महापालिकेने त्यांनी कोल्हापूर शहरासाठी केलेल्या कामाची दखल घेत, त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ५ सप्टेंबर १९०७ रोजी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे नाईक यांचा जन्म झाला. गणित विषयातील पदवीनंतर त्यांनी १९३० ते १९३७ या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला व धारवाड येथे शिक्षण मंडळाची स्थापना करून त्या परिसरात ग्रामीण विकासाचे कार्य केले. यानंतर १९४० ते १९४६ या कालावधीत कोल्हापुरात शहर विकासाचे मोठे काम त्यांनी केले. १९४८ ला ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन’ या संस्थेची मुंबईत स्थापना केली. १९५२ ते १९५७ या कालावधीत त्यांनी गारगोटी येथे मौनी विद्यापीठाची स्थापना करून उभारणी केली. १९५९ ते १९७८ या काळात त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार यासह केंद्रीय पातळीवरील विविध पदांवर काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना १९७४ साली ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले. यानंतरही त्यांनी १९७८ ते ८१ या कालावधीत पुण्यात भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली व तेथे अध्यापनही केले. एवढं मोठ्ठं काम केलेल्या या असामीने कोल्हापुरात तत्कालीन मंत्री पेरी, मिचेल, डॉ. पाटील, बॅ. बागवे, भास्करराव जाधव या मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापुरात शहर सुधारणांचा डोंगर उभा केला. त्याही वेळी त्यांनी अनेक कामे काढली म्हणून काहींनी टीका केली. मात्र शहर सुधारणेचे काम हे एकावर एक अवलंबून आणि परस्परपूरक असल्याचे त्यांनी पटवून दिल्यानंतर साहजिकच त्यांना पाठिंबा मिळत गेला. रस्ते तयार करताना अनेक घरे पाडावी लागत तेव्हा नोटिसा न पाठवता नाईक संबंधितांच्या घरी जात. त्याला अधिकाधिक नुकसानभरपाई कशी दिली जाईल, ते समजावून सांगत आणि त्यानंतर त्याची संमती घेत. अशा पद्धतीने त्यांनी अंबाबाई मंदिरासमोरून १४ घरे पूर्ण, अंशत: पाडून, ५० लहान-मोठ्या जागा ताब्यात घेऊन रंकाळ्यापर्यंत ताराबाई रस्त्याची निर्मिती केली. नाईक यांच्या काळातील शहर सुधारणा ४दत्ताजीराव माने स्कूल, ताराबाई विद्यालय व रविवार पेठेत शेलाजी वनाजी शाळेची स्थापना ४तळी व दलदल मुजवून प्रायव्हेट, न्यू एज्युकेशन, विद्यापीठ हायस्कूलला मैदानासाठी दिली जागा ४वरुणतीर्थ तळे मुजवून तेथे मैदान करून महात्मा गांधींचा पुतळा बसविला ४रावणेश्वर तळे मुजवून ती जागा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला दिली ४सन १९४४ ला भास्करराव जाधव वाचनालयाची स्थापना ४शालिनी पॅलेसमागे आदर्श खेडे तयार करण्यासाठी पाडले प्लॉट, तीच आजची फुलेवाडी ४रंकाळ्यासमोरील दीड एकरांतील डबके मुजवून तेथे पद्माराजे गार्डन ४हागणदारी मुक्तीसाठी भंगी पॅसेज योजनेचा शुभारंभ सतेज पाटील यांनी मनावर घेण्याची गरज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता असताना ज्या मौनी विद्यापीठाचे नेतृत्व सतेज पाटील करतात, त्याची स्थापनाही नाईक यांनीच केली. त्यामुळे पाटील यांनी ठरवल्यास नाईक यांच्या स्मृती जतन करता येतील. मुश्रीफ यांनी घेतली दखल आजरा तालुक्यातील सु. रा. देशपांडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेने ३० वर्षांपूर्वी नाईक यांच्या प्रतिमा सर्व शाळांमध्ये लावल्या. त्यानंतर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील नाईक यांचे बहिरेवाडी हे जन्मगाव. येथे मागणीची दखल घेत मुश्रीफ यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे नाईक यांचे स्मारक मंजूर करून आणले. त्याचे काम वेगाने सुरू आहे.