शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आयजीएममध्ये रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: March 4, 2017 00:43 IST

सुप्रिया देशमुख यांची माहिती : प्रसूती शस्त्रक्रिया लवकरच, शासन ताब्याचा परिणाम

इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाने ताब्यात घेतल्यापासून अवघ्या चार दिवसांत बाह्य रुग्णांची उपचार करून घेण्याची संख्या शुक्रवारी २५० वर पोहोचली आहे. याशिवाय पुढील आठवड्यापासून दवाखान्याकडे प्रसूती शस्त्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.नगरपालिकेला दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे पालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाने ताब्यात घ्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाला दिला होता. रुग्णालय हस्तांतरण करून घेण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न केले. त्याप्रमाणे ३० जून २०१६ ला शासन निर्णय झाला. त्यानंतर शासनाकडे अधिकारी व कर्मचारी असले तरी दवाखान्याकडे होणारा औषधांचा पुरवठा हळूहळू बंद झाल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरविली. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत तर दवाखान्याकडील यंत्रणा अक्षरश: ठप्प झाली होती. अशा पार्श्वभूमीवर आता २७ फेब्रुवारीपासून शासनाने दवाखाना हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच दिवशी बाह्यरुग्ण तपासणी व उपचार विभाग सुरू करण्यात आला. तेव्हा त्याचा लाभ सुमारे १२५ रुग्णांनी घेतला होता. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी बाह्यरुग्णांची संख्या १५० व २१६ वर पोहोचली. तसेच दवाखान्याकडील आंतररुग्ण विभागात महिला व पुरुष, असे १७ रुग्ण उपचार घेत आहेत.याबाबत अधिक माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाल्या, दवाखान्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने दवाखान्याकडील एकेक विभाग सुरू होतील. सहा महिन्यांत आधुनिक यंत्रसामुग्रीने व अधिकारी-कर्मचारी यांनी सुसज्ज असा हा दवाखाना रुग्णांच्या सेवेला तयार होईल. दवाखान्यातून बाह्यरुग्ण विभागाबरोबरच अन्य वैद्यकीय सेवा-सुविधा, तसेच २०० खाटांचा आंतररुग्ण विभाग सुरू होईल. हा दवाखाना सामान्य रुग्णालय म्हणून गणला जाईल.दरम्यान, दवाखान्याकडे रुग्णांची संख्या वाढावी, यासाठी शुक्रवारी दुपारी अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत असलेल्या शहरातील सहा केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी यांची एक बैठक डॉ. देशमुख यांनी घेतली. बैठकीमध्ये शहरातील विविध भागांत असलेल्या या केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील रुग्ण शासनाच्या दवाखान्याकडे पाठवावेत, असे आवाहन केले. शासनाच्या या रुग्णालयामध्ये अनेक महागडे उपचार मोफत होतात. तर काही शस्त्रक्रिया सुद्धा पूर्णपणे मोफत होत असल्यामुळे याबाबतची कल्पना रुग्णांना द्यावी, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)‘केईएम’मध्ये बाह्यरुग्ण विभाग शक्यआरोग्य सेवा देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असल्यामुळे नगरपालिकेमार्फत गावभागातील केईएम दवाखान्याकडे दोन सत्रात बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवता येईल. या विभागाला जोडूनच लहान बाळांना विविध प्रकारच्या रोग प्रतिबंधक लसीकरणाचे केंद्र चालविता येतील. या विभागाकडे आवश्यक असलेले अधिकारी व कर्मचारी सध्या आयजीएम दवाखान्याकडे अधांतरी असलेल्या ‘त्या’ ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांतून निवडता येतील, अशी मागणी काही नागरिकांतून होत आहे.