शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कोल्हापुरातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाचे हात जोडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:12 IST

सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोरोनापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कोल्हापूरमधील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले.

ठळक मुद्देलक्षणे जाणविल्यास तपासणीसाठी पुढे या, घाबरू नका हात जोडून विनंती करतो, घरातून बाहेर पडणे टाळा

संतोष मिठारीकोल्हापूर : गेल्या १९ दिवसांत मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एका वेगळ्या स्थितीतून गेलो आहे. या स्थितीत असताना वैद्यकीय उपचार पद्धती आणि नियमांचे तंतोतंत पालन केल्याने कोरोनापासून मी बरा झालो आहे. मला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे. कोरोनाची लक्षणे जाणविल्यास संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी पुढे या, घाबरून जाऊ नका. सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोरोनापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कोल्हापूरमधील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले.हार्डवेअर व्यावसायिक असलेला हा ३२ वर्षीय रुग्ण पुण्यातील रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. दि. २५ मार्चला कोल्हापूरमधील भक्तिपूजानगर येथील बहिणीला भेटण्यासाठी हा रुग्ण आला. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्याला उपचारासाठी पहिल्यांदा सीपीआर आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील दुसऱ्या स्रावाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोनाचे लक्षण असलेला ताप आल्यानंतर पहिल्यांदा मला भीती वाटली. मात्र, बहिणीचे पती आणि त्यांच्या नगरसेवक मित्राच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात तपासणी करून पुढे खासगी रुग्णालयात दाखल झालो. या रुग्णालयातील डॉक्टरांचे उपचार आणि त्यांनी सांगितलेल्या पथ्यांचे तंतोतंत पालन केले. वेळेवर औषधे घेतली. प्रबळ इच्छाशक्ती आणि उपचारांच्या जोरावर मला कोरोनामुक्त झाल्याचा आनंद वाटत आहे.

कुटुंबीय आणि समाजातील अन्य घटकांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तरी प्रशासन, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आणखी काही दिवस मी या रुग्णालयात थांबणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. त्याची माहिती प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी. कोरोनावर मात करण्याबरोबरच त्याच्यापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. प्रशासनाने दक्षता घेण्याबाबत सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन या रुग्णाने केले आहे.

उपचारांदरम्यान हे केले१) डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे तंतोतंत पालन२) हलक्या स्वरूपातील आणि साधे जेवण घेतले३) वेळेवर औषधे आणि नियमित व्यायाम४) आठ तास पुरेशी झोप घेतली.५) मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नामस्मरण आणि जप, कुटुंबीयांशी संवाद.

कुटुंबाची चिंता मिटलीमाझ्यामुळे बहिणीला संसर्ग झाल्याने मला खूप दु:ख वाटले. माझ्याप्रमाणे तीदेखील लवकरच बरी होईल, असा विश्वास या रुग्णाने व्यक्त केला. मला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबाची चिंता वाढली; पण मी वेळेत आणि योग्य उपचार घेतल्याने माझे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. आता त्यांची चिंता मिटली असल्याचे या रुग्णाने सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर