शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपत्रावर छायाचित्र नसल्यास आधार, पॅनकार्ड दाखवा-शिवाजी विद्यापीठाचा पर्याय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:22 IST

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदार

ठळक मुद्देविद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही; विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घ्यावे. ते करता आले नाही, तर या विद्यार्थ्यांनी शासनग्राह्ण ओळखपत्र (आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट) पर्यवेक्षकांना दाखवावे, असा पर्याय विद्यापीठाने बुधवारी काढला.

त्याबाबतच्या सूचना विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णातील संलग्नित महाविद्यालयांना दिल्या आहेत.विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या आणि द्वितीय वर्षातील पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण साधारणत: ३५ टक्क्यांपर्यंत आहे. प्रवेशपत्र आणि पदवी प्रमाणपत्रांतील चुकांच्या दुरूस्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाने बैठक घेतली. त्यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदी उपस्थित होते. त्यामध्ये या तांत्रिक चुकांची माहिती घेऊन ती दुरूस्त करण्याचा निर्णय झाला. त्यासह महाविद्यालयातील प्राचार्य, रजिस्ट्रार अथवा विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रवेशपत्र प्रमाणीकरण करणे, शासनग्राह्ण ओळखपत्र दाखविणे असे पर्याय निश्चित करण्यात आले. या निर्णयानुसार कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाने महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे दिल्या. प्रवेशपत्रांतील त्रुटी, चुकांमुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून व वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठाकडून घेतली जाईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.संगणक प्रणालीतील त्रुटींचा फटकासंगणक प्रणालीतील त्रुटींमुळे काही प्रवेशपत्रांवर छायाचित्र अपलोड झालेली नाहीत. ही त्रुटी दूर करण्याची सूचना संगणक प्रणाली पुरविणाºया ठेकेदाराला केली आहे. किती विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्याची माहिती संकलित केली जात आहे. तोपर्यंत विद्यापीठाने निश्चित केलेल्या पर्यायांची माहिती महाविद्यालयांना दिली असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, पदवी प्रमाणपत्रांमध्ये मुळात चुकीची माहिती सादर झाल्याने त्यामध्ये चुका झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्यांनी विद्यापीठातील दीक्षान्त विभागाशी संपर्क साधावा. त्यांना प्रमाणपत्र बदलून दिले जाईल.

टॅग्स :examपरीक्षाuniversityविद्यापीठ