शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

गॅस कनेक्शन नावावर नसेल, तर मोफत सिलिंडरही नाही; महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 26, 2024 12:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांना लाभ

इंदुमती गणेशकोल्हापूर : घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा दोन निकषांनुसार जिल्ह्यातील एकूण १२ लाख गॅस कनेक्शनधारकांपैकी फक्त अडीच लाख कुटुंबांना वर्षातून तीन मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे.

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू केली असून, पात्र कुटुंबांना वर्षातील तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याची जाहिरात माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचा जिल्ह्यातील किती महिलांना लाभ होऊ शकतो, हे ‘लोकमत’ने तपासले.केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक गॅस कनेक्शन आहेत; मात्र त्यापैकी फक्त अडीच लाख गॅस कनेक्शन हे उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. त्यामुळे एवढ्याच कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळतील.

असे आहेत निकष

  • गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक.
  • पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असावे.
  • ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’स पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशनकार्डनुसार) केवळ एक लाभार्थी पात्र असेल.
  • फक्त १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी आवश्यक.

३१ जुलैपूर्वीचे कनेक्शन पात्रया योजनेसाठी ३१ जुलै २०२४ पूर्वीचे गॅस कनेक्शन ग्राह्य धरले आहेत. ३१ जुलैपूर्वी ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता कनेक्शन महिलेच्या नावावर हस्तांतरित करून उपयोग होणार नाही.

पुरुषप्रधानतेचा फटका..जिल्ह्यात ९ लाखांवर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे; पण त्यापैकी फक्त अडीच लाख महिलांना तीन सिलिंडर माेफत मिळतील. समाज कितीही पुढारलेला असला तरी घर, जागेचा सातबारा, बँकांचे खाते, कर्ज, लाइट बिल, पाणी बिल, घरफाळा, गॅस कनेक्शन अशा महत्त्वाच्या बाबी पुरुषांच्याच नावे असतात. आता शासनाने योजनांच्या लाभासाठी अट घातल्याने महिलांच्या नावावर किमान बँक खाते तरी उघडले जात आहे, अन्यथा पूर्वी महिलांची खातीदेखील कमी होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाCylinderगॅस सिलेंडरGovernmentसरकार