शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कवाळे स्थायीचे तर, उत्तुरे परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:25 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली.

ठळक मुद्देकवाळे स्थायीचे तर, उत्तुरे परिवहन सभापती महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली.

मंगळवारी छत्रपती ताराराणी सभागृहात पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत विशेष बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.प्रथम स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुक झाली. राष्ट्रवादीचे संदीप शिवाजीराव कवाळे व भाजपचे विजयसिंह पांडूरंग खाडे- पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. कवाळे यांना १० तर खाडे-पाटील यांना ६ मते पडली.परिवहन सभापतीपदासाठी शिवसेनेच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांना आठ तर ताराराणीचे महेश यशवंत वासूदेव यांना पाच मते पडली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसच्या शोभा धनाजी कवाळे यांना पाच तर भाजपच्या भाग्यश्री उदय शेटके  यांना तीन मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका स्मिता माने या गैरहजर होत्या.  उपसभापतीपदासाठी वहिदा सौदागर यांनी रुपाराणी निकम यांचा पाच विरुध्द तीन मतांनी पराभव केला. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तिन्ही निवडी घोषित केल्या.यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडीनंतर फटकांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत नूतन सभापतींची त्यांच्या प्रभागात मिरवणुक काढण्यात आली. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर