शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

कोल्हापुरातील डीपी रोड विकसित झाल्यास वाहतूक समस्या सुटणार, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

By भारत चव्हाण | Updated: October 15, 2025 18:32 IST

प्रशासकांनी नेमली संयुक्त समिती

भारत चव्हाणकोल्हापूर : महापालिका नगररचना विभागाने आतापर्यंत शहरातील सहा लाख ६६ हजार ४९३ चौरस मीटरचा ‘टीडीआर’ संबंधित जागामालकांना दिला खरा, परंतु ज्याची खरोखरंच आवश्यकता आहे अशा विकास आराखड्यातील रस्त्यांच्या जागांचे संपादन झाले नसल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. विकास आराखड्यातील किमान दहा डीपी रोडच्या जागा महापालिका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या तर वाहतुकीची समस्या दूर होणार आहे परंतु अधिकाऱ्यांची स्वत: पुढाकार घ्यायचा नाही आणि रस्तेही करायचे नाहीत ही भूमिका शहर विकासाला मारक ठरली.सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर शहराचा विकास आराखडा, टीडीआर आणि नवीन रस्ते करण्याचा प्रश्न चर्चेत आला, त्यांनी दिलेले निर्देश पाहता किमान पुढील काही महिन्यांत डीपी रोडच्या जागा ताब्यात घेऊन तेथे रस्ते विकसित करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील जुन्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही विशिष्ट रस्ते, चौकातूनच नागरिकांना जावे लागत आहे. त्यामुळे ठराविक रस्त्यांवर वाहतुकीची समस्या त्रासदायक बनली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते रूंद होऊ शकत नाहीत, त्यामुळे उपनगरांतील विकास आराखड्यात दाखविलेले रस्ते विकसित केल्याशिवाय वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही हे ओळखूनच पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिशा दाखविली आहे. त्यानुसार काम होणे अपेक्षित आहे.

इंटरेस्टच्या फाईल हलल्या२००० सालापासून ‘टीडीआर’चा नियम अस्तित्वात आला. सार्वजनिक उपयोगासाठी ज्यांची जागा आरक्षित केली जाते, त्या जागामालकाला नुकसानभरपाई म्हणून जागेचा मोबदला रेडिरेकनरप्रमाणे हस्तांतरणीय विकास हक्क (टी.डी.आर) च्या माध्यमातून दिला जातो. ज्या जागांवर मोठे गृहप्रकल्प साकारले जाऊ शकतात अशा जागांचा टीडीआर कारभारी नगरसेवक, काही मोजके बांधकाम व्यावसायिक यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन घेतला. पण सार्वजनिक रस्त्यांच्या आरक्षित जागा ताब्यात घेण्याची तत्परता अधिकाऱ्यांनी दाखविली नाही.

३९६ पैकी १३० कि. मी रस्ते पूर्णकोल्हापूर शहराच्या २००० साली तयार केलेल्या विकास आराखड्यात ३९६ किलोमीटरचे रस्ते दाखविले गेले आहेत. त्यापैकी १३० किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात आले. पूर्ण झालेल्या रस्त्यापैकी ५० किलोमीटरचे रस्ते आयआरबीने केले. याचा अर्थ गेल्या पंचवीस वर्षांत महापालिका प्रशासनाला केवळ ८० किलोमीटरचे रस्तेच तयार करता आले. २६६ किलोमीटरचे रस्ते करण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे.

क्रिडाईतर्फे प्रायोगिक तत्त्वावर दोन रस्ते तयार करावेत म्हणून महापालिकेला प्रस्ताव देण्यात आला आहे. डी.पी. रोड करण्याबाबत गेले अनेक वर्षे पाठपुरावा करत आहोत, पण प्रशासनाकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. - के. डी. खोत, अध्यक्ष क्रिडाई 

प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अलीकडेच पुढाकार घेतला आहे. डी.पी. रस्ते करण्यासाठी त्यांनी समिती गठीत केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगेदेखील सकारात्मक आहेत. त्यामुळे जागामालकांना जागेचे मूल्य मिळेल, महापालिका जागा फुकट मिळेल, नागरिकांची सोय होईल. - सचिन ओसवाल, उपाध्यक्ष, क्रिडाई

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur DP Road Development to Solve Traffic Woes; Action Initiated

Web Summary : Kolhapur's DP road development aims to ease traffic by acquiring road spaces. Officials are urged to prioritize road construction, as 130 km of 396 km planned roads are completed. The administration is now proactively forming committees for DP road development.