शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लढा पुस्तकात न उतरल्यास गुन्हा : राजन गवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:27 IST

आजरा : सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावे म्हणून चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लढे उभा केले, अशा कार्यकर्त्यांचे लढे पुस्तकात लिहिले नसल्याची खंत व्यक्त करून यापुढेही न लिहिल्यास आमच्या हातून गुन्हा ठरेल, अशा शब्दांत डॉ. राजन गवसे यांनी खंत व्यक्त केली. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कॉ. संपत देसाईलिखित ‘एका लढ्याची ...

आजरा : सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावे म्हणून चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लढे उभा केले, अशा कार्यकर्त्यांचे लढे पुस्तकात लिहिले नसल्याची खंत व्यक्त करून यापुढेही न लिहिल्यास आमच्या हातून गुन्हा ठरेल, अशा शब्दांत डॉ. राजन गवसे यांनी खंत व्यक्त केली. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कॉ. संपत देसाईलिखित ‘एका लढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे आयुक्त आप्पासाहेब धुळाज होते.यावेळी डॉ. गवस म्हणाले, शंकर धोंडी पाटील, काका देसाई, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, आदींनी आपले आयुष्य खर्च केले. यांच्या लढ्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे आम्ही गुन्हेगार आहोत. मात्र, ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक इतिहासात नोंद होईल. मध्यवर्गाची घरापासून नाळ तुटली, तशी सामान्य माणसापासूनही तुटली. गांधीशिवाय पर्याय नसून गांधी, आंबेडकर, मार्क्सवाद यांच्या चांगल्या तत्त्वांची बांधणी झाली तरच यापुढे चळवळी टिकणार आहेत.कॉ. संपत देसाई म्हणाले, चित्रीचा लढा डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, कॉ. अशोक जाधव, कॉ. संजय तर्डेकर, आदी कार्यकर्त्यांमुळे यशस्वी झाला. यावेळी कवी व अजय कारंड, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे, प्रा. राजभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुनील शिंत्रे, सुधीर देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, एम. एल. चौगुले, अंकुश कदम, मायकेल फर्नांडिस, रावसाहेब देसाई, प्रकाश मोरस्कर, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी स्वागत केले. रवी शेंडे यांनी प्रास्ताविक केले.