शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

By admin | Updated: May 13, 2017 00:47 IST

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष, के.एम.टी.कडील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा, कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळेच के.एम.टी. तोट्यात चालली असून, येत्या महिन्याभरात रोजंदारीवर ५० वाहकांची भरती केली नाही तर सभापती म्हणून मी, परिवहन समितीचे सदस्य राजीनामा देऊन आयुक्तांचा निषेध करतील, असा इशारा परिवहन सभापती नियाज खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. यापुढील काळात रोजंदारीवरील तसेच कायम वाहक, चालकांनी पूर्वपरवानगी न घेताच जर अचानक दांड्या मारल्या तर अशांची गय केली जाणार नाही. त्यांना सरळ कामावरून कमी करण्यात येईल, अथवा निलंबित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. के.एम.टी.कडे बसेस चांगल्या आहेत. प्रवासीही मोठ्या संख्येने मिळत आहेत; परंतु वाहक, चालक यांचे अचानक दांड्या मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे के.एम.टी. प्रशासनास काही मार्गांवरील गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रत्येक दिवशी ३० ते ३५ हजार रुपयांच्या उत्पन्न बुडत आहे. परिवहन समितीचे सदस्य उत्पन्नवाढीचे जातीने प्रयत्न करत असताना के.एम.टी. कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. बसेस चालविणारेच बेजबाबदार व मनमानी वृत्तीने वागत असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, असे खान यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ३० चालक भरले आहेत. आता ५० रोजंदारी वाहक भरा म्हणून आयुक्तांना विनंती केली आहे; परंतु आयुक्त त्यासंबंधीच्या प्रस्तावावर सहीच करायला तयार नाहीत. आयुक्तांसारखे अधिकारीच जर निर्णय घ्यायला वेळ लावणार असतील तर मग के.एम.टी.चा गाडा कसा चालणार, असा सवालही खान यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस लाला भोसले, सचिन पाटील, विजयसिंह खाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, उमा बनसोडे, शोभा कवाळे उपस्थित होते. संजय भोसले बिनकामाचा माणूस प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले हे अत्यंत निष्क्रिय आणि बिनकामाचा माणूस आहे. त्यांचे के.एम.टी.कडे अजिबात लक्ष नाही. मागच्या महिन्यात सलग २३ दिवस ते के.एम.टी.च्या कार्यालयात फिरकले नव्हते. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे परिवहन समितीच्या सभेलाही येत नाहीत. यापुढे जर भोसले यांनी के.एम.टी.च्या कामात गांभीर्याने लक्ष घातले नाही तर त्यांच्या कार्यालयास कुलूप लावण्यात येईल, असा इशारा नियाज खान यांनी दिला. त्यांना जर के.एम.टी.चे कामकाज जमणार नसेल तर नोकरीचा राजीनामा देऊन घरला जावे. अन्य कोणाला तरी चांगले काम करण्याची संधी मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले. मनपामुळेच के.एम.टी. टिकलीय महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत केल्यामुळेच के.एम.टी. टिकली आहे. लाला भोसले सभापती असताना १० कोटींची मदत केली होती. आता मी सभापती असताना ८ कोटींची मदत करायचे ठरविले आहे. जर मनपा प्रशासनाने मदत केली नसती तर के.एम.टी. बंदच पडली असती, पण येथील प्रभारी व्यवस्थापकापासून ते वाहक, चालक, कार्यालयातील कर्मचारी यांची काम करण्याची मानसिकता नाही, असेही खान यांनी सांगितले.