शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आप्पू ट्रेनरने हेल्मेट घातले असते तर...!

By admin | Updated: July 24, 2016 00:37 IST

थोड्याशा चुकीमुळे येतेय आयुष्यभराचे अपंगत्व जीवघेणा अपघात

कोल्हापूर : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘हेल्मेट घातल्याशिवाय पेट्रोल देणार नाही,’ असा निर्णय घेतल्यावर त्याबद्दल सोशल मीडियातून विरोधाचा सूर आळविला जात असताना हेल्मेटची किती गरज आहे, याचे प्रत्यंतर आणून देणारी घटना दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात घडली. मुक्त छायाचित्रकार इजाज उर्फ आप्पू जानमहंमद ट्रेनर (वय ३२, रा. शाहूपुरी, घोरपडे गल्ली, कोल्हापूर) याचा मोटारबाईकवरून पडल्याने अपघात झाला असून, डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याने हेल्मेट घातले असते तर त्याला किरकोळ दुखापतही झाली नसती, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.आप्पू हा दिवंगत ज्येष्ठ छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांचा मुलगा. वडिलांचे अकाली निधन झाल्यावर कौटुंबिक अडचणी आल्या. पुढे आप्पू व नाझ हे दोन भाऊ फोटोग्राफर झाल्यावर कुटुंबाला काही प्रमाणात स्थैर्य आले. आप्पू हा काहीकाळ वृत्तपत्रांत छायाचित्रकार म्हणून काम करीत होता. गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास दसरा चौकातून घरी जाताना शाहू पुतळ्याच्या मागील बाजूस कुत्रे आडवे आल्याचे निमित्त झाले आणि तो बाईकवरून खाली पडला. तातडीने त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. तिथे मेंदूला इजा झाल्याचे समजल्याने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मेंदूला सूज आली आहे. गेले दोन दिवस तो अतिदक्षता विभागात आहे. रुग्णालयाचा व औषधांचाही खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्याचा कोणताही आरोग्य विमा नाही. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतून अपघाताचे उपच्ाार होत नाहीत. रुग्णालयाचा व औषधांचा खर्च कित्येक हजारांत आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत सापडले आहे. शनिवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुढाकाराने पत्रकारांनी काही रक्कम जमा करून तातडीची मदत म्हणून ट्रेनर कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. त्यावेळी श्रीमती जमेला ट्रेनर यांचे मन भरून आले. अशा अडचणीच्या क्षणी कोणीतरी आपल्याला आधार देत असल्याचे पाहून त्यांनाही थोडा धीर आला. शासनाच्या पत्रकार कल्याण मदत निधीतून काही मदत करण्याचेही प्रयत्न आहेत; परंतु हे सगळे घडले ते डोक्याला हेल्मेट न घातल्यामुळे!आप्पूवर कुटुंबाची आर्थिक भिस्त आहे. पत्नीसह दोन लहान मुले आहेत. त्यामुळे तो लवकर बरा व्हावा यासाठी सगळे अल्लाकडे दुवा मागत आहेत. या अपघातात त्याच्या फक्त डोक्यालाच मार बसला आहे. अन्य शरीराला साधा ओरखडाही पडलेला नाही. त्यामुळे अपघात झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते तर त्याला थोडा मुका मार बसला असता. अन्य कोणताच धोका पोहोचला नसता. एका हेल्मेटने त्याच्या जिवाचा धोका व आर्थिक नुकसान सहजपणे टळले असते.कोल्हापूर मृत्यूत जगात पुढे... डॉक्टरांच्या मतानुसार अख्ख्या युरोपात वर्षाला फक्त ३० लोक डोक्याला मार बसून मरतात आणि आपल्या कोल्हापुरात मात्र महिन्याला अशा अपघातांचे सरासरी १३ रुग्ण एका रुग्णालयात दाखल होतात. म्हणजे डोक्याला इजा होऊन मृत्यूचे कोल्हापुरातील प्रमाण हे जगात सर्वांत जास्त आहे. हेल्मेट सक्ती करा म्हणून आग्रह धरल्यावर आमच्याच रुग्णालयाच्या दारात हेल्मेटविरोधी कृती समितीने धरणे धरले, असाही अनुभव या नामांकित डॉक्टरना आला.