शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:58 IST

इचलकरंजी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त मित्रांनी येथील वहिफणी कामगाराचा खून केला. विजय जनार्दन सरदेसाई (वय २७, रा. स्वामी मळा, जवाहरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रजाक शेख व इस्माईल शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी ...

इचलकरंजी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त मित्रांनी येथील वहिफणी कामगाराचा खून केला. विजय जनार्दन सरदेसाई (वय २७, रा. स्वामी मळा, जवाहरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रजाक शेख व इस्माईल शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, जवाहरनगरमधील स्वामी मळा याठिकाणी राहणारा विजय सरदेसाई हा त्याचा मित्र रजाक शेख याच्याबरोबर देशी दारू दुकानात शनिवारी (दि. ३०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारू पित बसला होता. त्यांनी इस्माईल शेख या मित्राला देखील दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी बोलावले. इस्माईल आल्यानंतर दारू पिण्यासाठी विजयने पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिघेही इस्माईलच्या मोटारसायकलवरून कबनूर येथील फरांडे मळा येथे आले. दारूला पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या रजाक व इस्माईल यांनी विजयला शिवीगाळ करत मारहाण केली.विजयने त्यांना विरोध करताच इस्माईलने हात धरला व रजाकने त्याच्या डोक्यात दगड घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे विजय जमिनीवर निपचित पडला. ते पाहून भयभीत झालेले इस्माईल व रजाक दोघेही तेथून पळाले. दोघेही रात्री दहा वाजता त्यांच्या घरी गेले. इस्माईल हा विलास कोरवी याच्याकडे गेला. रजाक याने विजयच्या डोक्यात दगड घातल्याचे त्याने त्याला सांगितले. घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून कोरवी याने इस्माईलला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवली आणि रात्री उशिरा जयसिंगपूर येथे रजाक यास अटक केली. या खुनाची कबुली दोघांनीही पोलिसांना दिली आहे.संशयितांना हाकललेदारूच्या नशेत खून झाल्यानंतर संशयित आरोपी घाबरून गेले होते. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढत घर गाठले.घडलेली घटना त्यांनी घरातील नातेवाइकांना सांगितली. मात्र, घरातील लोकांना त्यांनी केलेला प्रकार रूचला नाही. त्यांनी दोघाही आरोपींना घराबाहेर हाकलून दिले.