शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

इचलकरंजीत पंचगंगेच्या पुराचे पाणी पात्राबाहेर

By admin | Updated: July 23, 2014 22:32 IST

नदीकाठावरील मंदिरे व स्मशानभूमीला पाण्याचा विळखा

इचलकरंजी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ परिसरामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीस पूर आला असून, येथे पुराच्या पाण्याने पात्र ओलांडले आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली असून, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. शहर आणि परिसरामध्ये गेले दोन दिवस पावसाच्या सरी जोरदारपणे कोसळत आहेत. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. सध्याच्या ऊस व खरीप पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस बरसत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणीयेलूर येथे पाण्यातूनच वाहतूक : मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील येलूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने त्यातूनच वाहतूक सुरू आहे; तर कोळगाव-पणुंद्रे, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर-कोकरूड मार्गावरील झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. गेले दोन दिवस मलकापूर, आंबा, करंजफेण, उदगिरी, शित्तूर-वारुण, येळवण जुगाई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा, कडवी, शाळी, आंबार्डी नद्यांना पूर आला आहे. वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील कांटे, रेठरे, गोंडोली, परळे निनाई, आकुर्ळे, माण, उचत, परखंदळे, आदी गावांत घरे पडली आहेत; तर पणुंद्रे, टेकोली, आदी बारा वाड्यांचा शाहूवाडीशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवेपैकी मोरेवाडी येथील वृद्धा हौसाबाई गणपती भालेकर या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविलाराधानगरी : राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग ६०० क्युसेक्सने वाढविला आहे. भोगावती नदीला पूर आला असून, तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तारेवाडी-हडलगे बंधारा पाण्याखालीनेसरी : तारेवाडी-हडलगे बंधारा आज पाण्याखाली गेला. सायंकाळपर्यंत बंधाऱ्यावर एक फुटाच्या वर पाणी आले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नेसरी-बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. कानडेवाडी बंधारा मात्र अजून पाण्याखाली आलेला नाही. त्यामुळे पर्यायी वाहतूक कानडेवाडी-तावरेवाडी-सांबरे मार्गे होईल. आज नेसरीतील सर्व शाळांनी मात्र नदीपलीकडील गावांमधील विद्यार्थ्यांना घरी लवकर पाठवले.