इचलकरंजी : शहर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय-निमशासकीय कार्यालये, विविध पक्ष, संस्था, शाळा, महाविद्यालये, आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. रक्तदान शिबिर, खाऊ वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. त्यामुळे देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत मोठे व गर्दीचे कार्यक्रम टाळण्यात आले.
प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलिसांनी ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अप्पर तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार उदय गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, श्रीकांत पिंगळे, आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप शहर कार्यालयामध्ये भारतमातेची प्रतिमा व संविधान फोटोचे पूजन नगराध्यक्षा अलका स्वामी व विजया महाजन यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अनिल डाळ्या, पुनम जाधव, तानाजी पोवार, अमर कांबळे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ताराराणी पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आमदार प्रकाश आवाडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अशोक आरगे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, राहुल आवाडे, विलास गाताडे, प्रकाश सातपुते, सुनील पाटील, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
दि न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये मान्यवरांनी ध्वजारोहण केले. अध्यक्षस्थानी शेखर पाटील होते. अमिषा मुल्ला या विद्यार्थिनीने संविधान वाचन केले. पर्यवेक्षक एम.के.परीट यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास वर्षा खंजिरे, मुख्याध्यापक एस.ए.पाटील, पी.डी.नारे, आर.बी.सपकाळ, आदी उपस्थित होते. बी.ए.कोळी यांनी आभार मानले.
श्री बालाजी माध्यमिक विद्यालय-ज्युनिअर कॉलेजमध्ये विजय बाबर यांनी ध्वजारोहण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे होते. यावेळी महेश कोळीकाल, डी.वाय. नारायणकर, शिवाजी कारंडे, सुंदरा जोशी, गणेश माच्छरे, आदींसह शिक्षक उपस्थित होते.
विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडीमध्ये विकास चौगुले यांनी ध्वजारोहण केले. मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पुष्कर उत्तुरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश मावळी यांनी केले. संपदा पाटील यांनी आभार मानले.
माई बाल विद्यामंदिरमध्ये विजय मगदूम व डॉ. चैताली मगदूम यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमास निर्मला ऐतवडे, मुख्याध्यापिका शैला कांबरे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली नेजे यांनी केले.
सरस्वती हायस्कूलमध्ये संदीप धुत्रे यांनी ध्वजारोहण केले. संगीत शिक्षक जे.जी.कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायिले. मुख्याध्यापक पी.डी.शिंदे यांनी स्वागत केले.
(फोटो ओळी)
२७०१२०२१-आयसीएच-०४
प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आदी उपस्थित होते.
(छाया-उत्तम पाटील)