शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ‘संगांयो’ अनुदानासाठी जीवावर उदार होऊन गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजनेतील विविध लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : इचलकरंजीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजनेतील विविध लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडवला आहे. कोणत्याही प्रकारची काळजी न घेता, अनेकजण याठिकाणी वावरत आहेत. जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तरीही पेन्शन घेण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियोजन करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह विविध पेन्शनधारक योजनांतर्गत मिळणारे ५०० ते २००० रुपयांपर्यंतचे अनुदान खात्यावरून काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत वयोवृद्धांची मोठी गर्दी होत आहे. दररोज टोकन देऊन बोलावले जात असले तरी नंबर लावून सगळे एकत्र जवळजवळ बसलेले असतात. यावेळी नियम पायदळी तुडवत सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले आहेत. पेन्शन घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागत असून, रस्त्यावरही नागरिक गर्दी करून थांबतात. काहीजणांच्या सोबत आलेलेही त्याच परिसरात गर्दी करून थांबतात. अशाने कोरोना कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकट

खात्यावरील पैसे परत जाण्याचा गैरसमज

खात्यावर जमा झालेले पैसे वेळेत काढून न घेतल्यास ते परत जातील, अशी भीती लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. हा गैरसमज असून, पैसे खात्यावरच राहतील आणि आवश्यकता असेल तेव्हा व कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर काढून घेतले तरी चालतील, याबाबतचे प्रबोधन संबंधित लाभार्थ्यांमध्ये करणे आवश्यक आहे.

फोटो ओळी

३१०५२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या आवारात विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत गर्दी केली होती.