शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीजवळ यंत्रमाग कामगाराचा खून, मित्रासोबत वाद झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:29 IST

हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे यंत्रमाग कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. अमोल दिलीप चव्हाण (वय ३0) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीजवळ यंत्रमाग कामगाराचा खूनमित्रासोबत वाद झाल्याचा संशय

यड्राव : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे यंत्रमाग कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. अमोल दिलीप चव्हाण (वय ३0) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे.इचलकरंजीपासून जवळ असलेल्या खोतवाडी पाण्याच्या टाकीजवळ निर्जन स्थळी मध्यरात्री ही घटना घडली. त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल १२ वार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमोल रात्री दहा वाजेपर्र्यत कारखान्यात काम करत होता, अशी माहितीही पुढे आली आहे.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरुण पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक बोलाविले होते, परंतु ते त्या परिसरातच घुटमळले.अमोल चव्हाण याचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वसंतगड येथे आहे. गेल्या 30 वर्षापासून यंत्रमाग कामासाठी ते येथे आले आहेत. खोतवाडीच्या शिंदे मळ्यात चव्हाण परिवार घर बांधून राहिले आहेत. त्याच्यासोबत आई, वडील व बहीण असा अमोलच्या मागे परिवार आहे. वसंतगड येथील नातेवाईकांना पहाटे तीन वाजता ही घटना समजल्यानंतर ते इकडे आले.यंत्रमाग कामगार असलेले त्याचे वडील दिलिप चव्हाण यांनी शहापूर पोलिसांत तक्रार दिली असून या घटनेची नोंद झाली आहे. आरोपीच्या शोधात पोलिस पथके सर्व दिशांनी रवाना झाली आहेत. 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर