शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

इचलकरंजीत घरकुल यादी आज प्रसिद्ध होणार

By admin | Updated: September 27, 2016 00:02 IST

नगरपालिकेच्या बैठकीत निर्णय : झोपडपट्टीधारकांचा ठिय्या; ६१२ लाभार्थ्यांच्या यादीवर हरकती, सूचना मागविणार

इचलकरंजी : जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी तयार असलेल्या घरकुलांच्या ६१२ लाभार्थ्यांची यादी आज, मंगळवारी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. उर्वरित १०८ लाभार्थ्यांकरिता घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असलेले तीन कोटी २४ लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय सोमवारी नगरपालिका बैठकीत घेण्यात आला.केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत शहरामधील जयभीम झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांचे अपार्टमेंट पद्धतीच्या घरामध्ये पुनर्वसन करण्यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या साडेचार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या इमारती पूर्णत्वास येत नसल्यामुळे संतप्त झोपडपट्टीवासीय आठवडाभरापासून नगरपालिकेसमोर उपोषण करीत आहेत. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घालून घरकुले पूर्ण करून ताब्यात मिळण्याची मागणी केली होती. त्यावेळी घरकुले तयार करणारा मक्तेदार बिपीन शहा यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते.दरम्यान, शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तेव्हा झोपडपट्टीवासीयांच्या घरकुलांच्या अनुदान निधीतून एक कोटी चार लाख रुपयांचा धनादेश मक्तेदाराला देऊन इमारती पूर्ण करून घेण्याचे ठरले होते. अशा पार्श्वभूमीवर सोमवारी लाभार्थ्यांच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. एक तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन झाल्यानंतर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष महावीर जैन, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, अभियंता संजय बागडे, मक्तेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शनचे शहा, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, तसेच झोपडपट्टीवासीयांच्यावतीने विठ्ठल शिंदे, प्रकाश पाटील, नाना पारडे, संजय निकाळजे, हणमंत शिंदे, बनसोडे, संजय गवळी, आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये लाभार्थींच्यावतीने नगरपालिका प्रशासन व मक्तेदार शहा यांना धारेवर धरण्यात आले. चर्चेवेळी आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वारंवार गोंधळ उडून तणाव निर्माण होत होता. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर, ६१२ घरकुलांपैकी ४४४ घरकुलांचे अंतिम काम पूर्ण करून ती नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येतील. उर्वरित ८६८ घरकुले जी अंतिम टप्प्यात असून, त्यांचे काम अंशत: बाकी आहे. ती तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यास सुरुवात झालेली नाही. त्या घरकुलांसाठी आवश्यक असलेला तीन कोटी २४ लाख रुपयांचा निधी शासनाच्या विशेष अनुदानातून उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरले. तसेच घरकुलांसाठी आलेल्या शासनाच्या अनुदानावरील बॅँकेत जमा झालेले व्याज घरकुल उभारणीसाठी वापरण्याची म्हाडाने मंजुरी द्यावी, यासाठी बुधवारी मुंबईला शिष्टमंडळ जाण्याचा निर्णयही घेण्यात आला. या शिष्टमंडळामध्ये लाभार्थ्यांचे प्रतिनिधी घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)शासनाकडून ४.२५ कोटी मिळविणे अत्यावश्यकजयभीम झोपडपट्टीमध्ये असलेल्या ७२६ लाभार्थ्यांपैकी ६१२ लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या इमारती अंतिम अवस्थेत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तीन कोटी ४९ लाख रुपये लागणार आहेत. तसेच उर्वरित १०८ घरकुलांकरिता तीन कोटी २४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. असा एकूण सहा कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करणे अत्यावश्यक आहे. यापैकी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी पालिकेकडून उपलब्ध होऊ शकतो. मात्र, नगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता उर्वरित निधीकरिता विशेष बाब म्हणून अनुदान मिळवून घ्यावे लागेल, अशी माहिती कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी यावेळी दिली.