शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत अतिक्रमण काढले : कारवाईत १५ खोकी-गाडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:45 IST

इचलकरंजी : नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पंधरा ठिकाणची खोकी व फेरीवाले गाडे जप्त केले.

ठळक मुद्देखोकीधारक-कर्मचाºयांत वादाचा प्रसंग गुरुवारपासून नोटिसा बजाविण्याचे काम सुरू होणार

इचलकरंजी : नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पंधरा ठिकाणची खोकी व फेरीवाले गाडे जप्त केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर केलेल्या कारवाईवेळी ५७ अतिक्रमणे संबंधितांनी स्वत:हून काढून घेतली, तर राजाराम स्टेडियमजवळ कारवाई सुरू असताना खोकीधारक व पथकातील कर्मचाºयांमध्ये झालेला वाद पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटविला.

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवार (दि. ५)पासून राजर्षी शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी धडक मोहीम चालविली आहे. मोहीम सुरू असताना पोलिसांचे पथक बरोबर असल्यामुळे काही ठिकाणी वाद झाले तरी ते पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटविण्यात आले. परिणामी या धडक मोहिमेला चांगलाच वेग आला आहे.

राजाराम स्टेडियम परिसरात अतिक्रमण करून आॅटो स्पेअर पार्टस् विक्रीचे मोठे खोके बुधवारी या पथकाने जप्त केले. त्याचबरोबर पानपट्टीच्या खोक्यावर कारवाई सुरू असताना संबंधित खोकीधारकाने कर्मचाºयांना विरोध केला. मात्र, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी खोकीधारकास पोलिसी भाषेत उत्तर दिल्यामुळे त्या ठिकाणचा वाद वाढला नाही. त्यानंतर या पथकाने के. पी. कॉम्प्लेक्सजवळील स्वेटर विक्री करणाºया दोन स्टॉलवर कारवाई केली. स्टॉल उभे करण्यासाठी वापरात आलेले प्लास्टिकचे कागद व काठ्या जप्त केल्या.

मराठा मंडळजवळील झुणका-भाकर केंद्राची एक गाडी व शिवाजी उद्यानाजवळील दोन खोकी उचलून ताब्यात घेतली. यावेळी वडा सेंटर चालविणाºया दोघाजणांकडून अनधिकृत असलेल्या स्वयंपाकाच्या तीन सिलिंडर टाक्यांवर कारवाई केली व त्या पुरवठा अधिकाºयांच्या ताब्यात दिल्या.रस्त्यांकडेच्या कारवर लवकरच कारवाईशहराच्या काही रस्त्यांवर कडेला गेले काही महिने चारचाकी गाड्या, जुन्या ट्रकच्या केबिन, तसेच नादुरुस्त ट्रॉली धूळ खात पडून आहेत. अशा गाड्या व ट्रकचे केबिन शोधून त्यांच्या मालकांना बाजार कर खात्याच्यावतीने आज, गुरुवारपासून नोटिसा बजाविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती या पथकाकडून देण्यात आली. त्याचबरोबर आठवडाभरात अशा प्रकारचे रस्त्यावरील अतिक्रमण संबंधितांनी न हटविल्यास ते जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.