शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

इचलकरंजी आगाराची 'दिवाळी'

By admin | Updated: October 29, 2014 00:10 IST

कार्य तत्परता : तीन दिवसांत ४२ लाखांचे उत्पन्न, एकूण सव्वा कोटीचे उत्पन्न अपेक्षित

अतुल आंबी -इचलकरंजी -जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या इचलकरंजी एस. टी. आगारास यंदा दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून एक कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत सुमारे ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण दिवाळी सुट्यांच्या कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. दिवाळीसारख्या सणात कर्मचाऱ्यांच्या डब्बल ड्युट्या आणि आगारप्रमुखांच्या योग्य नियोजनामुळे हे साध्य झाले आहे.दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण पर्यटनाला बाहेर पडतात, तर पाडवा, भाऊबीज यासाठी नातेवाईक पाहुण्यांकडे ये-जा करतात. एस. टी. खात्यातील कर्मचाऱ्यांना मात्र अशा सणावेळी डब्बल काम करावे लागते. यंदा येथील आगारप्रमुख किरण कुलकर्णी यांनी विभागीय सांख्यिकी अधिकारी अशोक कांबळे व डेपोचालक एस. डी. शांतिसम्राट, ए. आर. निकम यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन, नियोजन करून दिवाळीमध्ये एसटीला अधिक उत्पन्न मिळविले आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यातून सात दिवसांत ८४ लाख रुपये व दिवाळीच्या मुख्य तीन दिवसांत ४२ लाख रुपये असे एकूण एक कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुट्यांचा कालावधी संपेपर्यंत एकूण कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आगारप्रमुखांनी व्यक्त केला आहे.दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत २५ आॅक्टोबर रोजी भाऊबीजनिमित्त १९ जादा गाड्या सोडण्यात आल्या. सांगली, मिरज, कोल्हापूर, निपाणी या प्रमुख मार्गांवर वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात एकूण ३५ हजार १११ किलोमीटर प्रवास होऊन १२ लाख २५ हजार ७२२ इतके उत्पन्न मिळाले. २६ आॅक्टोबरला पुणे येथे कोल्हापूर मार्गे १३ जादा गाड्यांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात ३३ हजार ८६० किलोमीटर वाहतूक होऊन १२ लाख ६३ हजार ७०६ उत्पन्न मिळाले. तर २७ आॅक्टोबरला दिवसभरात ३९ हजार ८०० किलोमीटर वाहतूक होऊन १६ लाख १४ हजार ७९७ इतके विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी २०१३ मध्ये दिवाळीच्या तीन दिवसांत या आगाराने एक लाख ८४२ किलोमीटर प्रवास करून ३६ लाख ७५ हजार ९५८ रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. तर यंदा २०१४ ला दिवाळीच्या तीन दिवसांत एक लाख ८ हजार ७७१ किलोमीटरचा प्रवास करून ४१ लाख ४ हजार २२५ रुपयांचे उत्पन्न मिळविले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत सात हजार ९२९ किलोमीटर जादा वाहतूक करून चार लाख २८ हजार २६७ रुपयांचा अधिक नफा मिळविला आहे. सध्या आगाराकडे १०८ बस , १९३ चालक आणि २४७ वाहक काम करतात. दररोजच्या वाहतूक नियंत्रणासाठी साधारण ५६ चालक कमी पडत आहेत. तरीही दररोज ८१२ फेऱ्या केल्या जातात. त्यासाठी काहीजणांना डब्बल ड्युटी करावी लागते. आगारप्रमुखांनाही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यातून वाहतुकीचे नियोजन करताना अनेकवेळा डब्बल ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांना विनवणी करावी लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही होत आहे.दिवाळीतील कामगिरी....दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्नसात दिवसांत ८४ लाख रुपयांचे उत्पन्नतीन दिवसांत १ लाख ८ हजार किलोमीटर वाहतूक२०१३ मध्ये तीन दिवसांत ३६ लाख ७५,९८५ रुपये उत्पन्न२०१४ मध्ये तीन दिवसांत ४१ लाख ४ हजार २२५ उत्पन्न