शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 9, 2017 00:15 IST

कृष्णेची पाणी पातळी घटली : ५० टक्के कपात; पाच दिवसांनी येणार नळाला पाणी

इचलकरंजी : कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच इचलकरंजीस पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीत असलेल्या इंटेक वेलला पाणी पोहोचत नसल्याने दोन पंपांऐवजी एकाच पंपामार्फत पाण्याचा उपसा सुरू आहे. नदीमध्ये पाण्याची पातळी ५५२.५ मीटर इतकी आवश्यक असताना सध्या ती ५२१.६० मीटर इतकी आहे, अशी माहिती नगरपालिकेने बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. सदरची पातळी आणखीन खालावल्यास दुसरा पंपसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये किमान दीड मीटरने वाढ व्हावी, म्हणून राजापूर बंधाऱ्यामध्ये बरगे घालून पाणी अडविले पाहिजे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, सभापती नितीन जांभळे, आदींनी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे बुधवारी तातडीने बंधाऱ्याला बरगे घालण्याचे काम सुरू करण्यात आले, असेही या पत्रकात नमूद केले आहे. साधारणत: मजरेवाडी येथील पाण्याची पातळी वाढण्यास आणखीन आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये ५० टक्क्याने कपात होणार आहे. सध्या तीन दिवसांतून मिळणारे पाणी, पाच दिवसांतून एक वेळ मिळणार असल्याने उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)