शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

झेंडा लावण्यावरून इचलकरंजीत तणाव

By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST

सौम्य लाठीमार : जवाहरनगरात जमावबंदी

इचलकरंजी : येथील जवाहरनगरात कोले मळा साईमंदिर परिसरात झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून या परिसरात १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली. जवाहरनगरातील एका चौकात १९ जूनला शुभेच्छाचा फलक लावला होता. हा फलक फाडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर तिथेच नवीन फलक लावला. त्यावर चौकाचे नाव बदलल्यामुळे हा फलक काढून घेण्याची मागणी काही लोकांनी केली होती. मात्र, दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला होता. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी लागू करून तिथे बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी या परिसरात एका गटाने झेंडे व पताका लावल्या. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही गटांनी समोरासमोर येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. दोन्ही गटांतील प्रमुख लोकांशी चर्चा करून पोलिसांनी मध्यस्थी करीत संबंधित झेंडा काढून घेण्यास सांगितले. त्यानुसार जमावाने झेंडा काढून घेतला आणि वादावर पडदा पडला. जवाहरनगरातील तणावाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन गेले होते. दोन्ही बाजूंचे जमाव समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करू लागल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थांमार्फत विवादास्पद झेंडा उतरवून घेण्यास संबंधितांना सांगितले. आम्ही झेंडा काढून घेतो. मात्र, याचे छायाचित्रण अथवा चित्रीकरण होऊ नये, अशी मागणी जमावातील एका युवकाने केली. त्यानुसार सामंजस्याची भूमिका घेत पत्रकारांनी कॅमेरे बंद ठेवले होते. दुसऱ्या बाजूला दुचाकी लावून येणाऱ्या पत्रकार साईनाथ जाधव यांच्यावर जमावाने हल्ला चढविला. त्यांच्याकडील कॅमेरा काढून घेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका कार्यकर्त्याने जाधव यांची सोडवणूक करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार तेथे आले. त्यांनी पत्रकार जाधव यांना तुम्ही येथे कशाला आलात, असा दम देत त्यांचा कॅमेरा जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले. जाधव यांना मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालून पत्रकारांनाच दमदाटी करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार यांची तत्काळ बदली करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांना शहर पत्रकार संघटनेच्यावतीने देण्यात आले. मकानदार यांची बदली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)पत्रकारावर हल्ला; दहाजणांविरुद्ध तक्रार जवाहरनगरात वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार साईनाथ जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहाजणांविरोधात येथील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. अश्पाक मुजावर, रियाज जमादार, महंमद सनदी, हुसेन शेख, सैफ अली, इम्रान शेख व इतर चार ते पाच अनोळखी लोकांचा यामध्ये समावेश आहे. जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॅमेरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. गाडीवर आदळून गळ्यावर कशाने तरी मारहाण केल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.