स्वामी अपार्टमेंट परिसरातील नागरिकांसोबत आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. नव्याने निर्माण केलेल्या या योजनेची त्यांनी माहिती दिली. त्यामध्ये शहरातील गुन्हेगारी थोपविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे; परंतु तक्रार करणाऱ्याच्या अडचणी असल्याने पोलिसांपर्यंत माहिती पोहोचत नाही. यावर उपाय म्हणून 'फक्त एक मेसेज' ही मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मोठा गंभीर गुन्हा घडण्याआधी त्यावर नियंत्रण मिळविण्यास सोपे होईल. त्याचबरोबर पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी शहरातील सुमारे ५० ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांचे गस्ती पथक त्या-त्याठिकाणी वेळोवेळी पोहोचले आहे का, हे स्पष्टपणे समजणार आहे, अशी माहिती दिली. यावेळी शिवाजीनगरचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, नगरसेवक मनोज हिंगमिरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
इचलकरंजीत पोलिसांची 'फक्त एक मेसेज' मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST