शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ‘रात्रीस खेळ चाले’: फॉर्च्युन मल्टिप्लेक्समध्ये मध्यरात्री लावला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:18 IST

मध्यरात्री एकनंतर चित्रपट दाखविण्यास बंदी असताना रविवारी (दि. २६)मध्यरात्री इचलकरंजीतील फॉर्च्युन मल्टिप्लेक्स ‘रात्रीस खेळ चालला’ याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, चित्रपटगृहमालक कनक ब्रजलाल शहा यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीत ‘रात्रीस खेळ चाले’: फॉर्च्युन मल्टिप्लेक्समध्ये मध्यरात्री लावला खेळ अटी, शर्तींचे उल्लंघन : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून मालकाला कारणे दाखवा नोटीस 

प्रवीण देसाई

कोल्हापूर : मध्यरात्री एकनंतर चित्रपट दाखविण्यास बंदी असताना रविवारी (दि. २६)मध्यरात्री इचलकरंजीतील फॉर्च्युन मल्टिप्लेक्स ‘रात्रीस खेळ चालला’ याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, चित्रपटगृहमालक कनक ब्रजलाल शहा यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.इचलकरंजीतील ‘फॉर्च्युन मल्टिप्लेक्स’ या चित्रपटगृहात रविवारी (दि. २६) मध्यरात्री १.१५ वाजता ‘अवेंजर’ या चित्रपटाचा खेळ दाखविण्यात आला. याबाबत दुरध्वनीवरून जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीस अनुसरून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश इचलकरंजी करमणूक कर निरीक्षकांना देण्यात आले होते.

त्यानुसार सोमवारी (दि. २७) व मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री चित्रपटाचा शो लावल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यामध्ये सोमवारी (दि. २७) व मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४ या वेळेत ‘अवेंजर’ या चित्रपटाचा खेळ प्रदर्शित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच या खेळासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही प्रसिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.मुंबई चित्रपटगृह (विनियमन)अधिनियम १९५३ व महाराष्टÑ चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६६ अन्वये नमुना (ई) व नमुना (फ) मध्ये चित्रपटगृहासाठीचा परवाना देण्यात येतो. या परवान्यामधील अटी व शर्तींचे पालन करणे हे संबंधित चित्रपटगृह मालकास बंधनकारक असते.

यातील अटीनुसार कोणताही चित्रपट हा मध्यरात्री एकनंतर प्रदर्शित करता येणार नाही; परंतु ‘फॉर्च्युन मल्टिप्लेक्स’ या चित्रपटगृहाचे मालक कनक शहा यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे चौकशी अहवाल व उपरोक्त पुराव्यांमुळे समोर आले आहे; त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी सोमवारी (दि. २९) संबंधित मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी चित्रपटगृहाचा परवाना का रद्द करू नये, याबाबत लेखी म्हणणे स्वत: उपस्थित राहून सादर करावे.

याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला काहीच सांगायचे नाही, असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे; त्यामुळे मालक काय खुलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर