शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी नगरपालिकेत स्वच्छतेच्या नावावर अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:29 IST

इचलकरंजी : सध्या शहरातील कचरा संकलित करून तो कचरा डेपोवर टाकण्याचे काम बीव्हीजी कंपनी ३ कोटी ६९ लाख रुपयाला ...

इचलकरंजी : सध्या शहरातील कचरा संकलित करून तो कचरा डेपोवर टाकण्याचे काम बीव्हीजी कंपनी ३ कोटी ६९ लाख रुपयाला करीत आहे. मात्र, हेच काम नगरपालिकेकडून ६ कोटी १६ लाख रुपयांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये ६६.९३ टक्क्यांची वाढ असल्यामुळे नगरपालिकेचे २ कोटी ४७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडीने बहुमताने संमत केलेल्या या प्रस्तावास स्थगिती द्यावी, अशी मागणी राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.शहरातील रस्त्यांची लांबी ४५२ किलोमीटर आहे. असे असताना नगरपालिकेच्या ६८ घंटागाड्या असून, प्रत्येकी ३० किलोमीटर याप्रमाणे २०४० किलोमीटर इतकी फिरस्ती असल्याचे या प्रस्तावात दाखविण्यात आले आहे. त्यानुसार डिझेल खर्चाची आकारणी होणार आहे. वास्तविक पाहता वर्षाला ११ लाख ३२ हजार इतका इंधन खर्च येत असताना तो ४७ लाख १५ हजार असा दाखविण्यात आला आहे. यामध्ये ३६ लाख रुपयांची वाढ दाखविण्यात आली आहे. टिप्परच्या इंधन खर्चामध्ये तीस किलोमीटरऐवजी ५० किलोमीटर अशी अतिरिक्त वाढ दाखविण्यात आली असून, त्यामध्ये ३४ हजार रुपयांची जादा वाढ आहे.शहरात ४५२ किलोमीटर एवढे रस्ते असले तरी त्यातील अनेक रस्त्यांवर (बोळ वजा) घंटागाडी फिरणार नाही. घंटागाड्यांची संख्या अधिक असल्यामुळे प्रत्येक घंटागाडीला तीन ते चार तास काम करावे लागणार आहे. त्यावरील कर्मचारी अर्धवेळ असल्यामुळे एकूण वेतनाच्या ६० टक्के वेतन देणे आवश्यक आहे. तरीसुद्धा या कर्मचाºयांना अनुक्रमे १० हजार ४०९ रुपये व ८ हजार १९६ रुपये इतके वेतन देण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे. टिप्पर, कॉम्पॅक्टर आणि घंटागाड्या नवीन असल्यामुळे त्यांच्यावरील मेंटनन्स पाच टक्के धरणे आवश्यक आहे. मात्र, हा खर्च दहा टक्के गृहीत धरला आहे.नगरपालिकेच्या सभेमध्ये शाहू आघाडीकडून ४ कोटी १ लाख रुपये एवढे अंदाजपत्रक मंजूर करणे कायदेशीर व योग्य आहे, असे म्हणणे मांडण्यात आले होते. मात्र, ते फेटाळून सत्तारूढ आघाडीने बहुमताने ६ कोटी १६ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. अशा प्रकारे हा प्रस्ताव पूर्णपणे बोगस असल्याचे चोपडे यांनी म्हटले आहे.