शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वादातून इचलकरंजीत उद्योजकाचा खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 13:36 IST

इचलकरंजीत एका उद्योजकाची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे उघड झाले असून अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३५) असे या उद्योजकाचे नाव आहे. तारदाळ येथे रेल्वेफाटकाजवळ छापरवाल यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देआर्थिक वादातून इचलकरंजीत उद्योजकाचा खूनतारदाळ येथे रेल्वेफाटकाजवळ सापडला छापरवाल यांचा मृतदेह

कोल्हापूर : इचलकरंजीत एका उद्योजकाची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे उघड झाले असून अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३५) असे या उद्योजकाचे नाव आहे. तारदाळ येथे रेल्वेफाटकाजवळ छापरवाल यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.इचलकरंजीतील महेश कॉलनी परिसरात छापरवाल कुटुंबीय राहतात. छापरवाल कुटुंबीय हे कापड विक्री क्षेत्रातील बडे प्रस्थ आहे. छापरवाल कुटुंबाचा अत्याधुनिक यंत्रमागचा मोठा कारखाना आहे. शर्ट, सुटिंगचे ते नामांकित व्यापारी आहेत. गुरुवारी दुपारपासून छापरवाल कुटुंबीयांचा अशोक यांच्याशी संपर्क होत नव्हता. शेवटी रात्री उशिरा छापरवाल कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अशोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

शुक्रवारी सकाळी तारदाळ भागात अशोक छापरवाल यांचा मृतदेह सापडला. तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अशोक छापरवाल यांच्या हत्येमुळे इचालकरंजीच्या व्यापारी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर