शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी शहरात मोर्चेबांधणीला वेग

By admin | Updated: August 26, 2016 01:11 IST

‘मॅँचेस्टर’ची हाळवणकरांशी चर्चा : कारंडे गटाची दिशा पुढील आठवड्यात

इचलकरंजी : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असल्याने शहरातील राजकीय पक्ष व आघाड्यांच्या पातळीवर हालचालींना सुरुवात झाली आहे. मॅँचेस्टर आघाडीच्या बैठकीत शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी निर्णायक चर्चा करण्याचे निश्चित केले, तर राष्ट्रवादीतील कारंडे गटानेही आठवड्याभरात निर्णय घेऊन दिशा निश्चित करण्याचे ठरविले.नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय शासनाने घेतला. पावसाळी अधिवेशनानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात येऊन त्याप्रमाणे जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. परिणामी, नगराध्यक्ष निवडण्याची आरक्षणे बदलण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष निवडीची आरक्षणे जाहीर होताच संबंधित नगरपालिका क्षेत्रात असलेले राजकीय पक्ष व आघाड्या यामधील हालचालींना आणि मोर्चेबांधणीला वेग येईल, असा राजकीय जाणकारांचा व्होरा होता.मात्र, शासनाकडून नगराध्यक्ष आरक्षणाच्या सोडती लांबणीवर पडल्या आहेत. आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या कालावधीमध्ये पक्ष किंवा आघाड्यांमधील राजकीय जुळवाजुळवीची समीकरणे तयार होणे आवश्यक आहे. त्यानंतर मोर्चेबांधणी होऊन इच्छुक नगरसेवकांची नावे निश्चित केली जातील. म्हणून नगराध्यक्ष आरक्षणाची वाट न पाहता संभाव्य पक्ष किंवा आघाड्यांशी चर्चा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर मॅँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील नाट्यगृहाजवळील जलतरण तलावाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीसाठी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, आघाडीचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव प्रकाश मोरबाळे, नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेविका मीना बेडगे, राजू रजपुते, आदी उपस्थित होते. आघाडीच्यावतीने ‘शविआ’चे सर्वेसर्वा आमदार हाळवणकर यांच्याबरोबर मोरबाळे व शेळके यांनी चर्चा करावी. आघाडीचे चिन्ह कोणते असावे, त्याचबरोबर मॅँचेस्टर आघाडीसाठी किमान १२-१३ उमेदवार सोडावेत, असेही ठरले. बोलणी फिस्कटल्यास पुढील आठवड्यात स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असा निर्णय घेतल्याचे आघाडीचे अध्यक्ष चाळके यांनी सांगितले.दरम्यान, राष्ट्रवादीतील कारंडे गटानेसुद्धा पुढील आठवड्यामध्ये बैठक घेऊन निवडणुकीची दिशा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मात्र प्रमुख पक्ष राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील जांभळे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या पातळीवर शांतता आहे. (प्रतिनिधी)