शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इचलकरंजीत झोपडपट्टीवासीयांचा अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: October 6, 2015 00:27 IST

अतिक्रमण प्रश्न : घरकुलांच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येथील नेहरूनगरमध्ये घरकुले बांधण्यात येत आहेत. घरकुलांच्या इमारती बांधण्यासाठी रिकामे करण्यात आलेल्या जागेवर काही लोकांकडून अनधिकृतपणे बांधकामे व झोपड्या उभारल्या आहेत. त्या ताबडतोब हटवून तेथे घरकुलांच्या इमारती बांधाव्यात, अशा आशयाच्या मागणीसाठी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली नेहरूनगर झोपडपट्टीवासीयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना सुमारे तासभर घेराव घातला.केंद्र सरकारच्या अनुदान योजनेतून नेहरूनगर येथे झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुले बांधण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. सध्या ४८ घरकुलांची एक इमारत पूर्ण झाली आहे, तर आणखीन ५८८ घरकुलांच्या इमारती बांधणे आवश्यक आहे. या इमारती बांधण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी या झोपडपट्टी ठिकाणी असलेली अन्य अतिक्रमणे नगरपालिकेच्या पथकाकडून दूर करण्यात आली होती. रिकाम्या जागेवर आणखीन तीन इमारतींचे बांधकाम संबंधित मक्तेदाराकडून सुरू करण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी आता काही झोपड्या व अन्य प्रकारची अतिक्रमणे सुरू झाली आहेत. ती ताबडतोब हटवावीत, या मागणीसाठी नेहरूनगरमधील महिला-पुुरुष नागरिकांनी सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांना घेराव घातला. या आंदोलनामध्ये बेबी पवार, विजया कांबळे, जैबुन शेख, गोदाबाई माळगे, जयश्री तलवार, रुक्मिणी ऐवाळे, गीताबाई भोसले, अनिल धजनावळे, हणमंत माने, किरण गेजगे, महंमद खान, अब्दुल पिरजादे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्याचा निर्णयझोपडपट्टीवासीयांच्या वतीने नगरसेवक आवळे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, आदींनी यावेळी चर्चा केली. तेव्हा नजीकच्या काळात बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सध्या ४८ घरकुलांमध्ये लाभार्थी असलेल्या मृतांच्या वारसदारांना पाण्याची नळ जोडणी व वीज जोडणीसाठी ना हरकत दाखला देण्याचा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेऊन दाखले देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.