शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बारावा खेळाडू नाही, मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचा पहिला मान मलाच; संजय मंडलिक यांचा विश्वास

By राजाराम लोंढे | Updated: March 13, 2024 16:40 IST

'माझ्यासोबत भक्कम ताकद असल्याने काळजी नाही'

कोल्हापूर : ज्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास निधीसह उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे मी बारावा खेळाडू नाही, मुख्यमंत्र्यांकडून मलाच उमेदवारीचा पहिला मान मिळेल. असा विश्वास खा. संजय मंडलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.कोल्हापूरमधून महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत गेल्या तीन-चार दिवस उलटसुलट चर्चा सुरू असल्याने मंडलीक समर्थक कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या खासदारांची मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर खा. मंडलिक यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून भूमिका स्पष्ट केली. खा. मंडलिक म्हणाले, वृत्तपत्रातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीबाबत गेली रात्रंदिवस कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. निवडणूक म्हटले की, काही प्रमाणात खेचाखेची सुरू असणार, पण मला काळजी नाही. मुख्यमंत्री शिंदे शब्दाचे पक्के मुख्यमंत्री शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत. ज्यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत ११ खासदार होते. त्यांना बाराव्या खासदाराची गरज असल्याने खा. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला. यावेळी, मी कशासाठी तुमच्यासोबत येऊ? असा प्रश्न केला. तुम्हाला अडीच वर्षांत निधी मिळालेला नाही, हवा तेवढा निधी देतो व पुढची उमेदवारीही तुम्हालाच देतो, असे आश्वासन खा. शिंदे यांनी दिले. ..म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाेबत मुंबईत बैठक झाल्यानंतर त्यांनीही उमेदवारीची ग्वाही दिली. मात्र, माध्यमातील चर्चेने कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याने मंगळवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी इकडे कशाला आलाय प्रचाराला लागा, असे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, ॲड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम आदी उपस्थित होते.माझ्यासोबत भक्कम ताकद पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडीक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. विनय कोरे यांच्याकडेच माझे प्रचाराचे नियोजन राहणार आहे. एवढी भक्कम ताकद माझ्यासोबत असल्याने काळजी नसल्याचे खा. मंडलिक यांनी सांगितले.उमेदवारीबाबत साशंकता मग अधिवेशन कसे घेतले?शिवसेनेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात घेतले. सर्वात सुरक्षित दोन्ही मतदारसंघ असल्यानेच येथेच अधिवेशन घेण्याचा त्यांचा आग्रह होता, असा गौप्यस्फोटही खा. मंडलिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाSanjay Mandalikसंजय मंडलिक