शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: December 22, 2016 00:58 IST

‘कलर्स’ आणि ‘सखी मंच’तर्फे आयोजन : आई-मुलींच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम

कोल्हापूर : आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे मायेची ऊब, संस्कारांची शिदोरी, कुटुंबाचा कणा, आयुष्यात लाभलेला पहिला गुरू, जिने आपल्याला चालायला, बोलायला, जगायला शिकविले.... म्हणूनच ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ ही म्हण आपल्याला तिची महती सांगून जाते. मुलींसाठी आई म्हणजे तिची दुसरी मैत्रीणच. अशा या आई-मुलीच्या नात्यातील भावबंध व्यक्त करणारा ‘लोकमत सखी मंच’ व ‘कलर्स’तर्फे ‘तू माझा स्वाभिमान’ ही स्पर्धा मंगळवारी (दि. २०) उत्साहात पार पडली. केशवराव भोसले नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात आई आणि मुलीच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारित ‘आम्ही दोघी माय-लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सेलिब्रिटी जोडी म्हणून भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील, शोभा पाटील, दिशा पाटील व जाई पाटील उपस्थित होत्या.स्पर्धेच्या चार फेऱ्यांमध्ये आई-मुलीच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये आई-मुलीच्या जोडीने कविता, शेरो-शायरीच्या अंदाजात एकमेकींची ओळख करून दिली. दुसऱ्या फेरीमध्ये आई-मुलीने गायन, नृत्य, अभिनय सादर केला. तिसरी फेरी सिच्युएशन राउंड होती. यात परीक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करून तिच्याशी संबंधित प्रश्न विचारले. चौथी फेरी प्रश्नोत्तरांची होती. यात परीक्षकांनी आई आणि मुलीला एकमेकींच्या आवडीनिवडीवर प्रश्न विचारले. स्पर्धेचे परीक्षण रश्मी कुलकर्णी व शिल्पा इंगळे यांनी केले. नेहमीच कौटुंबिक विषय घेऊन येणाऱ्या ‘कलर्स’ चॅनेलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘कलर्स’वर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता आई-मुलीच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... एक स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका असलेल्या शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने जगणे शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नोकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून तो स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीद्वारे करिअरला अधिक महत्त्व देणारी स्त्री आदर्श का नाही? असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत, हे या मालिकेत दाखविण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी माय-लेकी’मध्ये एक-दुसऱ्यांना समजून घेणाऱ्या, एकमेकींसोबत मैत्रिणींसारख्या वागणाऱ्या आई-मुलीच्या जोड्यांना या कार्यक्रमात पुरस्कृत करण्यात आले. नितीन दीक्षित यांनी उपस्थित सखी सदस्यांसाठी वेगवेगळे गेम शो घेतले. त्यात महिलांनी पैठणीसह विविध बक्षिसे जिंकली. ‘आम्ही दोघी माय-लेकी’च्या विजेत्याप्रथम : शुभलक्ष्मी देसाई-प्रिया देसाईद्वितीय : मनीषा झेले-रचना झेलेतृतीय : सुजाता अढाव-साक्षी अढावकेशवराव भोसले नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या ‘तू माझा स्वाभिमान’ कार्यक्रमातील विजेत्या मायलेकींसोबत परीक्षक रश्मी कुलकर्णी व शिल्पा इंगळे उपस्थित होत्या, तर दुसऱ्या छायाचित्रात स्पर्धेत नृत्य सादर करताना सुजाता अढाव व साक्षी अढाव.