शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘तो मी नव्हेच’, राडेबाज ३८ गुरुजींचा पवित्रा

By admin | Updated: September 8, 2015 00:30 IST

समितीची दिशाभूल : शिक्षक बॅँक हाणामारीची चौकशी पूर्ण

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर  -प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा केलेले गुरुजी चौकशीत ‘तो मी नव्हेच’, आम्ही मिटवायला गेलो होतो, असा पवित्रा घेत शिक्षण विभागाच्या चौकशी समितीची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. चप्पल, खुर्च्यांची फेकाफेकी करतानाची छायाचित्रे, व्हिडिओ चित्रीकरण दाखविले तरी खोटी उत्तरे देऊन ‘राडेबाज गुरुजीं’नी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. चौकशीत सबळ पुरावे मिळू नये, म्हणून सध्या बँकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘मिलीभगत’झाल्याचे समोर येत आहे. शिक्षक बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २३ आॅगस्टला आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. या सभेत सत्तारूढ व विरोधकांच्यातील राड्यात कपडे फाटेपर्यंत शिक्षकांना मारहाण करण्यात आली. अर्वाच्च्य शिवीगाळ, खुर्ची, चप्पल यांची फेकाफेकी झाली. या घटनेचे विविध प्रसारमाध्यमांनी चित्रीकरण केले, छायाचित्रे काढली. चित्रीकरणातील व्हिडिओमध्ये आणि छायाचित्रांमध्ये चप्पलने मारहाण करणारे, खुर्च्यांची फेकाफेकी करणारे, कपडे फाडणारे, एकमेकांवर धावून जाणारे, तुटून पडणारे या सर्व गुरुजींचे चेहरे स्पष्टपणे दिसतात. त्यातील काही छायाचित्रे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत ठळक प्रसिद्धही झाले आहेत. चित्रीकरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुजींचा ‘प्रताप’ पोहोचला. शिक्षणक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सूचनेवरून प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली. गेल्या आठ दिवसांपासून चौकशी सुरू आहे. पहिल्यांदा चौकशी समिती बँकेत गेली. इतिवृत्ताची प्रत मागितली. त्यावेळी बँकेच्या प्रशासनाने अध्यक्षांना विचारायला हवे, असे सांगून उडवून लावले. समितीने बँकेला शासकीय कारवाईचा ‘धाक’ गोड शब्दांत सांगितला.सर्व चित्रीकरण, छायाचित्रे मिळविली. राडा करणाऱ्या गुरुजींचे चेहरे शोधले. अशाप्रकारे सापडलेले ३८ राडा करणाऱ्या गुरुजींची चौकशी केली. चौकशीवेळी संबंधित गुरुजींना सभेतील ‘अवतार’ छायाचित्रे आणि चित्रीकरणातून दाखविला. चौकशीतील सर्वच गुरुजींनी ‘तो मी नव्हेच, मी तर मिटवायला गेलो होतो,’ असा उलट पवित्रा घेत समितीची धूळफेक करण्याचा प्रयत्न केला.मिलीभगत...राड्यानंतर वृत्तपत्रांना प्रतिक्रिया देऊन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना दोषी ठरविले. गुंड आणून सभा उधळली, जहरी टीका केली. मात्र, चौकशीवेळी राडा केलेल्या कोणत्याही गुरुजींवर कारवाई होऊ नये म्हणून एकमेकांना सांभाळून घेत असल्याचे समोर येत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मिलीभगत आहे का, असा प्रश्न सभासदांतून उपस्थित होत आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. एकूण ३८ जणांची चौकशी करून जबाब नोंदविले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयारीचे काम सुरू आहे.