शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हसूरकरांनी दिला ‘जल है, तो कल है’ चा नारा

By admin | Updated: March 17, 2016 01:01 IST

जलव्यवस्थापनाचा आदर्श : ‘नळ तिथे मीटर’ योजना यशस्वी; सार्वजनिक चावी नाही

कोल्हापूर : हसूर (ता. शिरोळ) येथील शंभर टक्के नळांना मीटर बसवण्यात आले आहेत. या गावांत एकही सार्वजनिक चावी नाही. नळ पाणीपुरवठा योजना राबवून जलव्यवस्थापनाचाही आदर्श हे गाव सांगत आहे. काल, बुधवारपासून ‘जलजागृती सप्ताह’ सुरु झाला. त्या पार्श्वभूमीवर या गावाने कृतीतून ‘जल है, तो कल है...’हा नारा जोपासला आहे याची माहिती घेणे इतर गावांना मार्गदर्शक ठरेल. शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन अडीच हजार लोकसंख्येचे गाव गेली आठ वर्षे जलस्वराज्य प्रकल्प राबवत आहे. गावाला पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी मिळत आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के नळांना मीटर असणारे शिरोळ तालुक्यातील हे पहिलेच गाव आहे. गावात पाऊल टाकताच गावातील स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. गावातल्या उभ्या आडव्या गल्ल्यांमधून फिरताना कागदाचा एक कपटाही पडलेला दिसत नाही. सांडपाण्यासाठी भुयारी गटारे हे या गावचे आणखी एक वेगळेपण. गावात सन २००५ मध्ये यशवंत ग्रामसमृद्धी योजनेमधून जलस्वराज्य प्रकल्प मंजूर करण्यात आला. सन २००८-०९ पासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दहा टक्के लोकवगर्णीतून साठ लाख रुपयांचा निधी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गंत खर्च करण्यात आला. या निधीतून नऊ गुंठे जमिनीत पाण्याची टाकी, शुद्धिकरण यंत्रणा बसविण्यात आली. (हॅलो ६ वर)दृष्टिक्षेपात जलव्यवस्थापन..२००८-०९ पासून गावातील ४८० नळांना मीटर.गावात एकही सार्वजनिक नळ जोडणी नाही.जलजन्य आजार वा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही.वीज बिल थकबाकी शून्य.पाणी शुद्धिकरणासाठी इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर.१९६५ साली लोगवर्गणीतून भुयारी गटारांची बांधणीएक हजार लिटरला सहा रुपये प्रमाणे शंभर टक्के पाणी करवसुली.