शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

By admin | Updated: May 13, 2014 00:47 IST

जयसिंगपुरातील घटना : अनैतिक संबंधाच्या संशयातून डोक्यावर सळईने वार

जयसिंगपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात लोखंडी सळईने वार करून पत्नीचा निर्घृण खून करून पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होण्याचा प्रकार आज (सोमवार) घडला. सुजाता ऊर्फ विजया संतोष सावंत (वय ३२, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. इंदिरानगर झोपडपट्टी, जयसिंगपूर) असे मृत महिलेचे नाव आहे, तर संतोष रामचंद्र सावंत (३५. रा. नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे तिच्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : चौदा वर्षांपूर्वी सुजाता हिचा संतोष सावंत याच्याशी विवाह झाला होता. संतोष हा जेसीबी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यांना ओंकार (१३), प्रणव (१०) अशी दोन मुले आहेत. चालक असल्याने संतोष नेहमी बाहेरगावी असायचा, दरम्यान कुरुंदवाडमधील एका व्यक्तीशी सुजाता हिचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. त्यावरुन दोघांत वाद होत होता. सहा महिन्यांपूर्वी सुजाता ही प्रियकरासोबत बेपत्ता झाल्याची तक्रार संतोषने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. या घटनेनंतर सुजाता व संतोष यांच्यात समेट झाला होता. तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीमधील सोमनाथ जाधव यांच्या घरी तो भाड्याने राहायला आला होता. दरम्यान, काल (रविवार) रात्री संतोष व सुजाता यांच्यात पुन्हा वाद झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सुजाता झोपली असताना संतोषाने चिडून लोखंडी सळीने डोक्यात वार करून तिचा खून केला. आज सकाळी घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश घारगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकरे, शाम कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची फिर्याद सुजाताची आई मीना बळवंत ताबरे (४६, रा. झारी मशिदीच्या मागे, कुरुंदवाड)हिने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली. संशयित पोलिसांत हजर डोक्यात वार केल्यानंतर सुजाता गंभीर जखमी झाली. मोठा रक्तस्राव झाल्याने ती मृत झाली. पहाटे चार वाजता संतोष घरातून बाहेर पडला. प्रथम कुरुंदवाडला जाण्यासाठी बसस्थानकावर आला होता; मात्र बस नसल्याने त्याने कोल्हापूर गाठले. त्यानंतर सकाळी परत तो कुरुंदवाड पोलिसांत हजर होऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. कुरुंदवाड पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी संशयिताला आणण्यात आले होते. त्याच्या चेहर्‍यावर कोणताही लवलेश नव्हता.