हुपरी : हुपरी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी (आठवले) यांच्यावतीने राज्य सचिव मंगलराव माळगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री व चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पाटील हुपरीसाठी लवकर नगरपालिकेची घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.निवेदनामध्ये हुपरी (ता. हातकणगले) चा ग्रामपंचायतीतर्फे गावाचा विकास करणे मुश्कील असून अनेक सोयी-सुविधांपासून विकास खुंट८ा आहे. वास्तविक पाहता हुपरी नगरपालिकेचा प्रस्ताव २००७ साली जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत मंत्रालयात गेलेला असतानाही शासनाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष अशोक खाडे यांनी दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार मुंबई हायकोर्टाने ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वी नगरपालिका करण्याबाबतचा हुकूम शासनाला दिला आहे. तरीही शासनाने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हुपरी ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर व्हावे, अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तम कांबळे, मिलिंद शिंगाडे, जयकुमार माळगे, अमोल शेंडे, मिलिंद शिंगाडे, आदी उपस्थित होते.
हुपरी नगरपालिका करा
By admin | Updated: January 21, 2015 23:50 IST