शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारकांचा शेकडो पत्रांचा खजिना दुर्लक्षित : अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांचा संग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:34 IST

कोल्हापूर : दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना शहीद भगतसिंग यांच्या मातोश्रींचा पंजाब शासनाच्या वतीने गौरव करण्याचे ठरविले होते. मानपत्र, थैली, मोटारगाडी देण्याचा तो कार्यक्रम होता.

ठळक मुद्देभगतसिंगांच्या आर्इंचे मानसपुत्र बा. बा. महाराजांचे स्वप्न अधुरेच

समीर देशपांडे ।कोल्हापूर : दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना शहीद भगतसिंग यांच्या मातोश्रींचा पंजाब शासनाच्या वतीने गौरव करण्याचे ठरविले होते. मानपत्र, थैली, मोटारगाडी देण्याचा तो कार्यक्रम होता.

या कार्यक्रमाची निमंत्रणे अनेकांना गेली तसे ते कोल्हापूरच्या एका नागरिकाला आले. नव्हे, पंजाबच्या त्या वीरमातेने संबंधितांना सांगितले होते, ‘माझा एक मुलगा कोल्हापूरला राहतो. त्यालाही निमंत्रण पाठवा.’ या सन्मानाचे भाग्य लाभलेले हेच बा. बा. महाराज होत.

इंग्रजी दैनिकांमध्ये काम करणारा पत्रकार, एक इतिहास व पुराणवस्तू संशोधक, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला लेखक अशा विविध भूमिकांमधून कोल्हापूर नगरीत कार्यरत राहिलेले बा. बा. महाराज यांची २४ फेब्रुवारी २०१८ पासून जन्मशताब्दी सुरू झाली आहे. मात्र ‘शहीद भवन’ उभारून त्यामध्ये क्रांतिकारकांचे जीवन आणि त्यांच्या अनेक वस्तू, शेकडो पत्रे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या रक्षा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी आणि व्हायोलीनवादक रामसिंग यांच्या वापरातील गुप्ती अशा अनेक वस्तू एकत्रित प्रदर्शित करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ते मूळचे साताऱ्याचे. नंतर कोल्हापूर हीच त्यांची कर्मभूमी बनली. ‘टाइम्स’बरोबर त्यांनी फ्री प्रेस, सेंटिनल, बॉम्बे क्रॉनिकल या दैनिकांमध्ये काम केले. मात्र त्यांचा मूळ पिंड हा स्वातंत्र्यसैनिकाचा होता, इतिहास संशोधकाचा होता. बाबांनी नाना पाटील, बर्डे गुरुजींच्या सहवासात पत्री सरकारचा अनुभव घेतला. डॉ. जे. पी. नाईक आणि त्यावेळचे पोलीस निरीक्षक एफ. डी. रोच यांनी बाबांच्या आयुष्याची दिशाच बदलवून टाकली. नाईक यांनी त्यांना त्यांच्या आवडत्या पुरातत्त्व खात्याकडे वळविले. कोल्हापूरमध्ये ब्रह्मपुरीत डेक्कन कॉलेजमार्फत डॉ. सांकलिया आणि एम. जी. दीक्षित हे उत्खनन करीत होते. त्यात बाबांचा समावेश केला. संशोधनानिमित्ताने त्यांनी सारनाथ, नालंदा, खजुराहोबरोबरच भारतभर अनेक वेळा प्रवास केला. प्राचीन स्थळे आणि उत्खननाचा अभ्यास केला.

याच वेळी दिवंगत राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना संशोधकाच्या अंगाने स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास लिहिण्यास सांगितले. माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांनीही बाबांची चिकाटी, धडपड पाहून प्रवासासाठी त्यांना मदत केली होती. करवीर नगर वाचन मंदिराच्या आवारात सापडलेल्या सुवर्णमुद्रा असोत किंवा केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ पाया खोदताना मिळालेल्या देवांच्या मूर्ती, ताम्रपटाबद्दलही बाबांनी एक संशोधक म्हणून केलेले मार्गदर्शनच अखेर प्रमाण मानावे लागले.बा. बा. महाराज यांचे संकलनझाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रजीतून चरित्रलेखन, ‘फ्रीडम मूव्हमेंट कलेक्शन ट्रस्ट’ची स्थापना, ‘शहीद भवन’ उभारण्याचा संकल्प, क्रांतिवीर चिमासाहेब यांनी फिरंगोजी शिंदे यांना दिलेला जांबिया, १८५७ च्या बंडाची नोंद असलेल्या तसेच भगतसिंगांच्या फाशीची नोंद असलेल्या पंचांगांची प्रत, भगतसिंगांच्या घराण्याची वंशावळ, जुनी वृत्तपत्रे, शेकडो क्रांतिकारकांची पत्रे, अनेक नाणी, जुने नकाशे, अनेक शस्त्रे यांचे संकलन बा. बा. महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राजेश त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.