शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हुंबरवाडीतील रेश्माच्या मदतीसाठी हात सरसावले

By admin | Updated: March 22, 2017 23:39 IST

‘लोकमत’ने दिली हाक : जगण्यासाठीची धडपड सुरूच; तरुणांनी गावात काढली मदतफेरी

बिळाशी : एकीकडे पैशाच्या लालसेने दुसऱ्याला ओरबाडण्याच्या घटना समाजात घडत असताना, दुसऱ्याच्या दु:खाने गलबलून जाऊन रक्ताच्या नात्यापलीकडेही माणुसकीचा गहिवर असणारे काही लोक समाजात आहेत. एमपीएससी करणारी रेश्मा शिंदे तीन महिने कोमात असून, जगण्यासाठी तिची धडपड सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच मदतीचे हात सरसावले. इस्लामपूरचे उद्योजक सर्जेराव यादव यांनी तिला आर्थिक मदत केली.बिळाशी (ता. शिराळा) येथील दुरंदेवाडीजवळ हुंबरवाडीची रेश्मा संजय शिंदे (वय २०) ही तरुणी अत्यंत हुशार. दहावी, बारावीला शाळेत पहिली. विद्यापीठातही उत्तम गुण मिळवून राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास करणारी रेश्मा निव्वळ अभ्यासाच्या ध्यासामुळे आजारी पडली. ताप अंगात मुरला आणि ती कोमात गेली. फाटक्या परिस्थितीच्या आई-वडिलांजवळचे पैसे संपले. पण जिद्द संपली नाही. लेकीला बरे करायचे, या जिद्दीने वडील पायाला भिंगरी बांधून साऱ्यांचे हुंबरे झिजवत आहेत. ‘लोकमत’मधून याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सर्जेराव यादव यांनी हॉस्पिटलमध्ये रेश्माची भेट घेतली. तिला पाहून त्यांचे हृदय पाझरले आणि त्यांनी २० हजारांची मदत दिली. बिळाशीच्या बंडा कोळेकर, दत्ता सुपेकर, दत्ता शिराळकर, वैभव सातपुते, विजय रोकडे, विश्वास पाटील, बाबासाहेब परीट, विष्णू पाटील, आनंदराव पाटील, पोपट कदम यांच्यासह अनेक तरुणांनी गावातून फेरी काढून एका दिवसात ४० हजार रुपये जमा करून वडिलांकडे दिले. सांगलीहून झिनत मुजावर यांनीही मदत दिली. शिरशीहून अमर पाटील, ‘अंनिस’चे डॉ. सुनील पाटील यांनीही मदत केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वत: प्रयत्न केले, तर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी मदत केली.(वार्ताहर)