शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:03 IST

कोल्हापूर : यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती ही फार मोलाची भूमिका बजावते. आजच्या धावपळीच्या युगात यांत्रिकीकरणाला मानवी बळाची जोड मिळत ...

कोल्हापूर : यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती ही फार मोलाची भूमिका बजावते. आजच्या धावपळीच्या युगात यांत्रिकीकरणाला मानवी बळाची जोड मिळत असेल तर कोणताही उद्योगधंदा यशस्वी होतो, असे प्रतिपादन थायलंड (बँकाक) येथील डॉ. थॉसापॉर्न मोहम्मद यांनी केले.अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात दुसऱ्या आंतरराष्टÑीय संशोधन परिषदेत डॉ. थॉसापॉर्न प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह होते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आॅफ स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायझेस सिंगापूर या विषयावर डॉ. थॉसापॉर्न म्हणाले, लहान मुलांमध्ये काम करण्याची वृत्ती व जिद्द सुरुवातीपासून निर्माण केली पाहिजे, तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. कमी वयातील जबाबदाºया माणसाला मोठे बनवितात. मानवी शक्तीचे योग्य नियोजन म्हणजे यश होय. यावेळी इंडो ग्लोबल चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चरल यांच्यातर्फे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांना शिक्षण क्षेत्रातील ‘व्हिजनरी लीडर अवॉर्ड’ डॉ. थॉसापॉर्न यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संशोधन परिषदेमधील ३०० हून अधिक संशोधन लेखांचे प्रकाशन ‘अजंठा’ या युजीसी मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत करण्यात आले. या संशोधन पत्रिकेचा प्रकाशन समारंभही यावेळी झाला. या परिषदेसाठी ४०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी नावनोंदणी केली होती. या परिषदेसाठी २० विदेशी विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार सुबोधभाई शाह, प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर, उपप्राचार्य डॉ. पी. पी. शाह, कार्यक्रमाचे सचिव डॉ. चंद्रवदन नाईक, निमंत्रक डॉ. ए. बी. नाडगौडा, प्रा. एम. एम. बागवान, डॉ. अशोक डोनर, डॉ. प्रताप पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. डॉ. जे. डी. इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.