शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महापौर किती करायचे एक की दोन?, कॉँग्रेस आघाडीत दुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:59 IST

आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भूमिका घेतली असताना काही नगरसेवक व एका पदाधिकाऱ्याने एक ‘कोल्हापूर उत्तर’ला तर दुसरी संधी ‘कोल्हापूर दक्षिण’ला द्यावी, असा प्रस्ताव समोर आणला. त्यावर अंतिम निर्णय हा उद्या, बुधवारी होणार आहे.

ठळक मुद्देमहापौर किती करायचे एक की दोन?कॉँग्रेस आघाडीत दुमत : उद्या पुन्हा बैठक

कोल्हापूर : आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भूमिका घेतली असताना काही नगरसेवक व एका पदाधिकाऱ्याने एक ‘कोल्हापूर उत्तर’ला तर दुसरी संधी ‘कोल्हापूर दक्षिण’ला द्यावी, असा प्रस्ताव समोर आणला. त्यावर अंतिम निर्णय हा उद्या, बुधवारी होणार आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागा नवीन महापौरांकरीता पुढील आठवड्यात निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉँग्रेसच्या सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे अजमावून घेतले. यावेळी दीपा मगदूम, नीलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. मात्र, चौथ्या इच्छुक इंदुमती माने या बैठकीला उपस्थित नव्हत्या.पालकमंत्री पाटील यांनी इच्छुकांना विचारले तेव्हा चौघीनींही ‘मी इच्छुक आहे; माझा विचार करावा.’असे सांगितले. त्यावेळी दोन-चार महिन्याला महापौर करायला लागत असल्याने समाजातून टीका होत आहे. आता हा प्रकार बंद करून आणि पुढील नऊ महिन्यांच्या काळाकरीता एकीलाच संधी दिली जाईल, तुम्ही पाच जणी एकत्र बसून एकाचे नाव निश्चित करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली तेव्हा इच्छुकांनी ‘तुम्हीच निर्णय घ्या, तो आम्हाला मान्य असेल,’ असे सांगितले.परंतु स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी एकीला संधी देण्याऐवजी दोघांनी द्यावी आणि ती एक ‘उत्तर’मधील तर दुसरी ‘दक्षिण’मधील नगरसेविकेला द्यावी, अशी सूचना मांडली. आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे चार-चार महिने दोघींना संधी द्यावी, असा आग्रह देशमुख यांनी धरला. अन्य काही नगरसेवकांनी देशमुख यांच्या सूचनेचा विचार करावा,असे सांगितले.महापौरपदासाठी लॉबिंग करू नका, शक्तिप्रदर्शन करू नका, मलाच महापौर करा म्हणून समाजाची वेगवेगळी शिष्टमंडळे आणून मला भेटवू नका, अशा सक्त सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी सर्व इच्छुकांना दिल्या. सुमारे पस्तीस मिनिटे चर्चा झाली, परंतु ठाम निर्णय मात्र झाला नाही.

महापौर एक करायचा की दोन यावरच दुमत झाल्यामुळे अंतिम निर्णयासाठी उद्या, बुधवारी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना वीस-वीस मिनिटे वैयक्तिक चर्चेला वेळ दिली जाणार आहे. मला महापौर का करावे हे या वेळेत इच्छुकांनी पालकमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यायचे आहे.

दीपा मगदूम, आजरेकर यांची नावे चर्चेतमहानगरपालिकेत गटनेते शारंगधर देशमुख यांचा एक गट कार्यरत आहे. ते स्वत: गटनेते असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडे काही नगरसेवकांची ऊठबस असावी. त्यांनी दोन महापौर करण्याचा तसेच ‘उत्तर व दक्षिण’चा मुद्दा मांडल्यामुळे दीपा मगदूम व नीलोफर आजरेकर यांची नावे चर्चेत आली आहे. मगदूम यांच्या मुलांची तर आजरेकर यांच्या दिराची देशमुख यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे देशमुख त्यांच्याच नावांचा आग्रह धरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर