शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

‘आयआरबी’चे देणे भागवायचे कसे?

By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST

महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह : अतिरिक्त कर, फेर सर्व्हेक्षण व न्यायालयात जाण्याचे पर्याय

संतोष पाटील- कोल्हापूर --न्यायालयाचा आदेश व राज्य शासनाचे टोलबाबतचे धोरण पाहता, ‘आयआरबी’च्या सर्व देण्यांची तरतूद महापालिकेलाच करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेची परिस्थिती हलाखीची असताना नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. रस्ते मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार महापालिका ३२५ कोटी रुपयांचे देणे लागते. १७० कोटी पेक्षा कमी रकमेची कामे झाली असताना आता इतकी रक्कम द्यायची कशी? हा प्रश्न महापालिकेला सतावीत आहे.प्रकल्पाची मूळ किंमत २२० कोटी आहे. निगेटिव्ह ग्रॅँडचे २५ कोटी वजा करून १९५ कोटी राहतात. अद्याप किमान २५ कोटींची कामे बाकी असावीत, असा अंदाज आहे. म्हणजे प्रकल्पाची किंमत १७० कोटींवरच येते. कराराप्रमाणे किती कामे झाली? त्यांची किंमत काय? हे एकत्रित सर्व्हेनंतर स्पष्ट होणार असले, तरी असा सर्व्हे करण्याची मागणी करूनही रस्ते विकास महामंडळ किंवा राज्यशासन तयार झालेले नाही. रस्ते विकास प्रकल्पाचा करार हा महापालिका, आयआरबी व एमएसआरडीसी यांच्यातील त्रिस्तरीय करार आहे. यामुळे महापालिका कोणताही निर्णय एकट्याने घेऊ शकणार नाही. करारानुसार अद्याप ९५ टक्के काम पूर्ण झालेले नाही. तेवढे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करता येत नाही. याबाबत महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. आता याच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जाण्याचा महापालिकेसमोर पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सांगा, जगायचे कसे ? महापालिकेचा प्रश्नमहापालिकेचे अपेक्षित उत्पन्न २५० कोटींचे असले तरी सद्य:स्थितीत २०० कोटींचा टप्पा पार करणेही तिला मुश्कील आहे. यातच थेट पाईपलाईनसाठीचे कर्ज काढावे लागणार आहे. पंधरा वर्षांसाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांना साडेनऊ कोटींप्रमाणे सहा कोटी ७० लाखांचा वर्षाला बोजा पडेल. आयआरबीचे देणे भागविण्यासाठी किमान १५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडल्यास दरवर्षी १५ कोटी कर्जाचे हप्ते द्यावे लागतील. यापूर्वीच नगरोत्थानचे २६ कोटी, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा ३७ कोटी ५० लाख कर्जाचा बोजा असलेल्या पालिकेला नव्या कर्जाचा भार कसा पेलवणार ? टोलचे पैसे द्यावे लागल्यास ‘सांगा, जगायचे कसे?’ असे म्हणण्याची वेळ पालिका प्रशासनावर येणार असल्याचे प्राप्त परिस्थिती दर्शविते.भूखंडाचे काय ?महापालिकेचे तीन लाख चौरस फुटांचा मोठा भूखंड ‘आयआरबी’ला ९९ वर्षांसाठी दिला आहे. या भूखंडाची किंमत ‘डीएसआर’ प्रमाणे १०० कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे योग्य मूल्यांकन, आयआरबीने आतापर्यंत वसूल केलेली टोलची रक्कम व भूखंडाची किंमत वजा केल्यास मनपावर फारसा बोजा पडणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.संयुक्त पाहणीच नाहीरस्ते विकास प्रकल्पाच्या ९५ टक्के कामाच्या पूर्ततेबाबत भिन्नता आढळत असून, प्रकल्पाची जिल्हाधिकारी, आयुक्त व आयआरबीचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करावी, अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी १ फेब्रुवारी २०१३ ला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. यावेळी आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर यांनी त्यास नकार दिला होता. मात्र, अद्याप अशी संयुक्त पाहणीच झाली नाही. संयुक्त पाहणी झाल्याखेरीज एकांगी दिलेल्या प्रकल्पाच्या किमतीचा अहवाल मान्य न करण्याची कृती समितीची भूमिका आहे.पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत एलबीटी-७७ मुद्रांक शुल्क-१३ पाणीपुरवठा-४० मिळकत कर-४२ इस्टेट -०८ नगररचना-२५ शासकीय अनुदान-३२ खर्चआस्थापना खर्च १५२ कोटीवीज व पाणी२५ कोटीविकासनिधी१५ कोटीप्राथमिक शिक्षण१८ कोटीघनकचरा व्यवस्थापन०५ कोटीकर्जाचा डोंगरथेट पाईपलाईन ४२ कोटीभूसंपादन १८ कोटीवाढीव खर्च ६५ कोटीएसटीपी कर्ज३७.५० कोटीनगरोत्थान योजना २६ कोटी