शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:05 IST

कोल्हापूर : शासनाकडून निधी आणायचा आम्ही आणि केलेल्या कामांचे श्रेय घेण्याकरिता तुम्ही परस्पर उद्घाटने कशी काय करता? असा खडा ...

ठळक मुद्देनिधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?आ. महाडिक यांचा सवाल : प्रोटोकॉलचे भान ठेवा

कोल्हापूर : शासनाकडून निधी आणायचा आम्ही आणि केलेल्या कामांचे श्रेय घेण्याकरिता तुम्ही परस्पर उद्घाटने कशी काय करता? असा खडा सवाल आमदार अमल महाडिक यांनी आयुक्तांसमोरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी विचारला. ज्यांनी निधी आणला, त्यांना साधे निमंत्रण देण्याचे तसेच प्रोटोकॉल सांभाळण्याचे भान ठेवा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापुढे असला प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिला.महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आमदार अमल महाडिक यांनी शासकीय निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना पत्र दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार कधी नव्हे इतके आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाºयांना आयुक्तांसमोरच झापले.शहरात एलईडी बल्ब लावण्याचा प्रकल्प केंद्र सरकारचा असून तो पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महाडिक यांनी मंजूर करून आणला होता; परंतु गेल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या कामाचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. हाच मुद्दा बैठकीत कळीचा ठरला.

सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून एलईडी बल्ब लावण्यात येत आहेत. त्याच्या प्रारंभाचा कार्यक्रम संयुक्तपणे ठेवायला पाहिजे होता. ‘तुम्ही मला तसेच पालकमंत्र्यांनाही त्याबाबत निमंत्रण दिले नाही. असे व्हायला नको होते. तुम्ही परस्पर कसा प्रारंभ केलात?’ असा सवाल महाडिक यांनी विचारला.‘तो कार्यक्रम प्रशासनाने ठेवला नव्हता,’ असा खुलासा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केला. तेव्हा महाडिक आणखी भडकले. ‘जर प्रशासनाने कार्यक्रम ठेवला नव्हता तर अधिकारी तेथे कसे गेले याचे उत्तर द्या, अशा शब्दांत त्यांंनी झाडले. ‘तुम्ही कामाची उद्घाटने करताना सर्वांनाच बोलवा. शासकीय प्रोटोकॉल सांभाळा,’ असे त्यांनी सुचवले.येथून पुढे शासकीय निधीतून मिळालेल्या अमृत योजना, पाणीपुरवठा पाईप प्रारंभ, प्रधानमंत्री आवास योजना, अंबाबाई मंदिर परिसर विकासकामाचा प्रारंभ यांसह कोणतेही कार्यक्रम परस्पर करू नका,. मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्घाटनाकरिता आणणार आहे. त्याकरिता तुमच्याकडून तारीख निश्चित करावी व मला कळवावी, असे महाडिक यांनी आयुक्तांना सांगितले.शहरातील सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याकरिता आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांबरोबर बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड मिळतील याची व्यवस्था करावी, पुनर्वसित झोपडपट्टीतील जागा या संबंधित १२४० झोपडीधारकांना लीजवर देऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची व्यवस्था करावी.

रंकाळा तलावाभोवती गोल्डन नेकलेसकरिता दोन कोटींचा निधी तांत्रिक अडचणीमुळे थांबला असल्याने तांत्रिक अडचण दूर करावी, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, शिंगणापूरअंतर्गत जलवाहिनी टाकण्याची कामे जलद गतीने करा, अग्निशमन दलाकडे टर्न टेबल लॅडर वाहनखरेदीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागून घ्या, अशा सूचना महाहिक यांनी दिल्या. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक किरण नकाते उपस्थित होते.

आमदार निधी वापरण्याचे आदेश द्याआमदार फंडातून दक्षिण मतदारसंघात जेथे निधी देण्यात आला आहे, तो त्या कामावर तातडीने खर्च करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना महाडिक यांनी आयुक्त कलशेट्टी यांना केली. राजलक्ष्मीनगर प्रभागात निधी वापरू नका, असे नगरसेविकेने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जर असे प्रकार घडत असतील तर आयुक्तांनी आपल्या अधिकारात ही कामे पूर्ण करावीत, अशी सूचना केली. संबंधित नगरसेवकांशी मी स्वत: बोलून कामे करून घेण्यास सांगतो, असे आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर