शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:48 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने दर्जा दिला जाणार आहे. या विभागाने नवीन वर्षात हॉटेलच्या तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. दर्जा दिल्यानंतर त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध अन्नपदार्थ खाण्यास मिळणार आहेत.ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत यासाठी केंद्र्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग कामास लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचतारांकित हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या २६६२ हॉटेलची नोंद विभागाकडे आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारने हॉटेलचा दर्जा ठरविण्यासाठी ४७ निकष घालून दिलेले आहेत. हे कामकोल्हापूर विभागाचे आठ अन्न सुरक्षा अधिकारी पाहणार आहेत. त्याचा आढावा हे दर महिन्याला अधिकारी घेणार आहेत. समजा, एखाद्या हॉटेलला दर्जा मिळाला पण; दोन-तीन वर्षांनंतर या हॉटेलमध्ये त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ नुसार निश्चित कारवाई करून त्यांचे हे मानांकन रद्द करण्यात येईल, असे विभागाने सांगितले.अशी राहणार प्रक्रियाहॉटेल मालकाचे आॅनलाईन रजिस्टर होईल. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत हॉटेलची तपासणी करतील. या तपासणीअंती हॉटेलच्या दर्जाचे (उदा.‘अ’, ‘ब’,‘क’, ‘ड’) मानांकन त्यांना मिळेल. त्याची नोंद केंद्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडे राहणार आहे. त्याचा फायदा देशभरातील पर्यटकांसह ग्राहकांना होणार आहे. हे मानांकन हॉटेलमधील दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे.परवाना फलक दर्शनीजवळ लावला पाहिजे.मोफत पिण्याचे पाणी द्यावे.कामगारांची वर्षातून दोनवेळा वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे.कामगारांनी हातमोजे व अ‍ॅपरल घालणे.कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये, त्यांनी नीटनिटके राहावे.पाणी साठवण्याची टाकी दर महिन्याला स्वच्छ करावी. ती निर्जंतुक केली पाहिजे.किचन पेस्ट करणे (उदा. झुरळ, मुंग्या, उंदीर, पालींचा बंदोबस्त करणे, त्यांचा वावर स्वयंपाकघरात असता कामा नये)मालाची तारीख लिहून ठेवणे गरजेचे आहे.विविध प्रकारचे मसाले, कडधान्ये, तेल आदी एक्सायरी डेट झालेले माल वापरात घेऊ नयेत.प्रत्येक मालाचे बिल असले पाहिजे, तो माल परवानाधारकाकडूनच घेतला पाहिजे.हॉटेलचे मेन्यू कार्ड असणे गरजेचे.