शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन

By समीर देशपांडे | Updated: December 16, 2023 19:14 IST

डॉ. मुजुमदार यांनी कोल्हापूरमधील अनेक आठवणी जागविल्या

कोल्हापूर : सर्व समाजातील मुले शिकावीत यासाठी विविध जाती धर्माची वसतिगृहे उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. कोल्हापुरातील ही वसतिगृहे छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टेपणाचे प्रतिक आहेत असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पदमभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी केले.‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ११० व्या कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीवेळी ते बोलत होते. समीर देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.गडहिंग्ललज येथील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयातील अध्ययन, सारस्वत बोर्डिंगमधील वास्तव्य आणि गोखले महाविद्यालयातील अध्यापन अशा अनेक आठवणी यावेळी डॉ. मुजुमदार यांनी जागविल्या. सामाजिक काम करताना अपमान गिळायला शिकण्याची गरज असून त्या काळातही मला असे अनेक अनुभव आले. परंतू जिद्द, स्वच्छ हेतू आणि कष्टाची प्रचंड तयारी यामुळे यश मिळत गेले. नियतीनेही साथ दिली आणि आज सिंबायोसिस हा भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार बॅंड बनला आहे. कोणत्याही राष्ट्राचा विकास होण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज असून या दोन्ही क्षेत्रात सिंबायोसिस आघाडीवर आहे.रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. यावेळी संजीवनी मुजुमदार, माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, सारस्वत बोर्डिंगचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका घटनेने बदलले आयुष्यडॉ. मुजुमदार म्हणाले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रेक्टर होतो.  एका माॅरिशसच्या विद्यार्थ्यांला एक मुलगी बाहेरून सलग काही दिवस जेवण आणून देत होती. हा नेमका प्रकार काय आहे याची माहिती घेतल्यानंतर तो मुलगा काविळीने आजारी होता. त्याची बहिण त्याला बाहेरून जेवण आणून देत होती. मला खरा प्रकार समजला आणि मग मी पुण्यात शिकायला आलेल्या विदेशी मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. तर त्यांचे पुणे आणि भारताबद्दल मत वाईट होत चालले होते. म्हणूनच या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सिंबायोसिस उभी  करण्याचा निर्णय घेतला. या एका साध्या घटनेतून सिंबायोसिसचा जन्म झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर