शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

घर सांभाळत रुग्णसेवा हे कौतुकास्पद

By admin | Updated: May 13, 2015 00:52 IST

अरूंधती महाडिक : ‘सीपीआर’साठी खासदार कमी पडणार नाहीत, जागतिक परिचारिका दिन

कोल्हापूर : कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडून वेळेवर उपचार करून रुग्णांना तुम्ही लवकरात लवकर तंदुरुस्त करून घरी पाठवता हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी परिचारिकांबद्दल गौरवोद्गार काढले. त्या मंगळवारी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्यावतीने आयोजित जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार समारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न, निधीचा जो प्रश्न असेल त्यासाठी खासदार धनंजय महाडिक कमी पडणार नाहीत, असे आश्वासनही दिले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे, ‘सीपीआर’चे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ए. एस. चौगुले, अनिल लवेकर, सुमती जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधिसेविका वंदना व्ही. शहाणे अध्यक्षस्थानी होत्या.अरूंधती महाडिक म्हणाल्या, एखादा रुग्ण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांचे परिचारिकांवर दडपण असते. तरीही परिचारिका न डगमगता आपली सेवा बजावतात. धनंजय महाडिक यांच्या प्रचारावेळी मी फिरत असताना जनतेला दोन खासदार देणार असे सांगत होते; त्यामुळे माझे पती धनंजय महाडिक व मी पूर्णवेळ समाजसेवेसाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर ‘सीपीआर’चे अनेक प्रश्न असोत अथवा निधीचा प्रश्न; त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पुढील काळात ‘सीपीआर’चे जे प्रश्न असतील, ते खासदार सोडवतील, अशी ग्वाही देत नेहमी चांगल्या कामाला यश मिळते, हे कोल्हापूर सर्किट बेंचला राज्य शासनाने दिलेल्या मंत्रिमंडळाच्या ठरावावरून दिसून येते, असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले.डॉ. दशरथ कोठुळे म्हणाले, सेवाभाव, सदाचार व सत्कर्म केल्याने आपल्या जीवनात कमी पडत नाही. रुग्णालयात सध्या ६५५ खाटा आहेत; पण, परिचारिका, परिसेविका यांची अपुरी संख्या असली तरीही त्या काम करण्यामध्ये कमी पडत नाहीत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा हाश्मत हावेरी यांनी प्रास्ताविक केले. समारंभास नेहा कापरे, भाग्यश्री शहा, जयश्री सौंदत्तीकर, निशा पारखे, सुजाता उरुणकर यांच्यासह उपाध्यक्ष संजीवनी दळवी, सरचिटणीस संदीप नलवडे, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर मुठे, मनोज चव्हाण, पूजा शिंदे, श्रीमंती पाटील, आदी उपस्थित होते.