शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आशा, गटप्रवर्तकांना सेवेत कायम करा

By admin | Updated: April 22, 2015 00:24 IST

आशा वर्कर्स युनियनचा मेळावा : जिल्हा परिषदेची आरोग्य योजना कायमस्वरूपी राबवा

कोल्हापूर : स्वत:च्या आरोग्याची तमा न बाळगता नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करून किमान वेतन देण्यात यावे व जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या आरोग्य योजना कायमस्वरूपी करण्यात याव्यात, अशी मागणी आशा वर्कर्स युनियनच्यावतीने करण्यात आली. कोल्हापुरातील इंद्रप्रस्थ हॉल येथे मंगळवारी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने आयोजित मेळाव्यात या विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील होत्या. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अमर आडकेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, सिटू संघटनेचे भरमा कांबळे, मनीषा पाटील, उज्ज्वला जडे उपस्थित होत्या. यावेळी जनतेच्या आरोग्याच्या अभिनव योजना सुरू केल्याबद्दल संघटनेच्यावतीने मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, आशांचे योगदान लक्षात घेऊन राज्य सरकारने अन्य राज्यांप्रमाणे आशा व गटप्रवर्तकांना दरमहा निश्चित मानधन सुरू करावे. आरोग्याबाबत नागरिकांना ‘अच्छे दिन’ येण्यासाठी योजना कायमस्वरूपी कराव्यात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, जिल्हा परिषदेचे कामकाज आदर्शवत होण्यात आरोग्य विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातही अगदी तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांनी स्वत: झोकून देऊन केलेल्या कामांमुळे हे यश मिळू शकले. आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर म्हणाले, आशा व गटप्रवर्तक हे आरोग्य रक्षणासाठीची शक्ती आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कायापालट योजना, आशा संजीवनी योजना, चिरायू योजना अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या पुढील काळातही आशांसाठी अभिनव योजना सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शशिकांत खोत म्हणाले, आरोग्य विभागाच्यावतीने आशांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य सहकार्य करतील. त्यानंतर जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मुमताज हैबर व भरमा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता कामते यांनी स्वागत केले. मंदाकिनी तोडकर यांनी आभार मानले. मेळाव्यातील ठराव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजना कायमस्वरूपी करण्यात यावी.आशा व गटप्रवर्तकांना कायम करण्यात यावे व त्यांना किमान वेतन लागू रावे.मोबाईल भत्ता ५०० रुपये करण्यात यावा.‘आशा संजीवनी’चा मोबदला २०० ऐवजी ४०० रुपये करण्यात यावा.गटप्रवर्तकांना दप्तर कामासाठी (रेकॉर्ड मेंटेनन्स) भत्ता सुरू करावा व ाोबाईल भत्ता ५०० रुपये करावा.मासिक मिटिंगचा प्रवासभत्ता देण्यात यावा.आशा व गटप्रवर्तकांना मेडिक्लेम योजना सुरू करावी.