गडहिंग्लजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील सुपर अभिनव अॅकॅडमीतर्फे सीईटी, जेईई व नीट परीक्षेतील यशस्वी, शासकीय अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ओम शहा, शुभम चौगुले, विश्वजीत सावंत, सुजन धनवडे, ओंकार कुरंगे, गौरव पाटील, ओंकार माने, सुदर्शन राजगोळे, तृप्ती पाटील, मृणाली पोवार, रितेश सुतार, तेजस चौगुले या विद्यार्थ्यांचा डॉ. जी. एस. राशिनकर, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, उपनगराध्यक्ष महेश कोरी, संचालक एस. बी. पाटील, संदीप पाटील, एस. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अंकिता पाटील हिने आभार मानले.
-----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सीईटी परीक्षेतील यशाबद्दल शुभम चौगुले याचा सत्कार डॉ. जी. एस. राशिनकर यांच्या हस्ते झाला. डॉ. अमोल पाटील, सतीश पाटील, महेश कोरी, एस. बी. पाटील उपस्थित होते.
क्रमांक : २१०२२०२१-गड-०१