शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: December 26, 2015 00:15 IST

पहाटेपासून पाहणी : अधिकाऱ्यांचे समाधान; जिल्हाधिकाऱ्यांना दिला अहवाल

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. गुरुवारी पहाटे प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे यांच्या पथकाने संपूर्ण शहराची पाहणी करून पालिकेच्या कामावर समाधान व्यक्त केले. पाहणीनंतर मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल या पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. पहाटे चार वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत तब्बल पाच तास या पथकाने शहरातील गल्ली-बोळाची पाहणी केली. मुरगूड नगरपरिषदेच्या २४ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्या पद्धतीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. याला अनुसरून गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांनी शहराची पाहणी केली. सर्वांचे स्वागत मुख्याधिकारी बी. एस. जगताप यांनी केले. त्यानंतर भल्या पहाटे या पथकाने चौगले पाणंद, गावभाग, तुकाराम चौक परिसर, माधवनगर, पोलीस स्टेशन परिसर, कन्याशाळा रोड, आंबेडकरनगर, कापशी रोड, बाजारपेठ आदी भागांत हे पथक फिरले. काही ठिकाणी स्वत: मोनिका सिंह यांनी स्वच्छतागृहांची तपासणी केली तसेच फिरस्त्या लोकांच्या वस्तीवर जाऊन नागरिक व महिलांच्या बरोबर संवाद साधून वास्तवता जाणून घेतली. संपूर्ण शहराच्या पाहणीदरम्यान कोठेच उघड्यावर शौचास बसलेले अथवा केलेल्या घटना आढळल्या नाहीत. याशिवाय अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसची पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर पालिकेमध्ये सर्वांची बैठक झाली. यामध्ये मुख्याधिकारी बी. एम. जगताप यांनी हागणदारीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न सांगितले. नागरिकांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी आपण प्रोत्साहित केल्याचे सांगून जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी ३५ सिट्स शौचालये बांधल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २० शौचालये बांधली असून १० शौचालयांची कामे सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले. या पथकामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. वाय. तारळकर, सर्कल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी राम शिंदे, स्वच्छता पाणी विभाग अभियंता अनिल गंदमवाड, स्वच्छता निरीक्षक दिलीप कांबळे, सूर्याजी भोवळे, भिकाजी कांबळे, अमर कांबळे, संदीप पाटील, दत्ता कांबळे, अशोक तांबट, अमोल कांबळे, अजित गुरव, आदी प्रमुख सहभागी झाले होते.