शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा घोटाळा : आणखी तिघे कारवाईच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:37 IST

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी चौकशीची तिसरी फेरी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार एका अधिकाऱ्यासह आणखी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देघरफाळा घोटाळा : आणखी तिघे कारवाईच्या कचाट्यातसंजय भोसले कारवाईच्या रडारवर ?

 कोल्हापूर : महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी चौकशीची तिसरी फेरी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार एका अधिकाऱ्यासह आणखी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कामकाजाची किचकट पद्धत याचा गैरफायदा घेत स्वत:च्या अधिकारात अनेकांचा फरफाळा कमी करून महापालिकेचे नुकसान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. यापूर्वी करनिर्धारक दिवाकर कारंडे, अधीक्षक नितीन नंदवाळकर, अनिरुद्ध शेटे, लिपिक विजय खातू अशा चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.या चौघांनी मिळून चौदा प्रकरणात तीन कोटी १८ लाखांचे नुकसान केल्याचे चौकशी समितीने नमूद केले होते; परंतु ही चौकशी पक्षपाती झाली असून, सात प्रकरणात १ कोटी ४७ लाखाचे नुकसान झाले आहे, तसेच या प्रकरणात तत्कालिन कर निर्धारक व ज्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास फिर्याद दिली ते संजय भोसलेसुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्यावरदेखील फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली होती.प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी यासंबंधीची चौकशी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त विनायक औंधकर यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल प्रशासक बलकवडे यांच्याकडे शुक्रवारी सादर केला.ही चौकशी सुरू असताना काही कारभाऱ्यांकडून राजकीय दबावदेखील आल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यामुळे या अहवालात काय नमूद करण्यात आले आहे, कोणा कोणाला दोषी ठरविण्यात आले आहे, याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. येत्या एक दोन दिवसात त्यावर प्रशासक बलकवडे या निर्णय घेण्याची शक्यता आहे.संजय भोसले कारवाईच्या रडारवर ?तक्रारदार भूपाल शेटे यांनी तत्कालिन करनिर्धारक संजय भोसले यांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्याचे काही पुरावेदेखील त्यांनी प्रशासकांना सादर केले आहेत. त्यामुळे ते कारवाईच्या बाबतीत रडारवर असल्याची चर्चा आहे. भोसले यांचा पाच प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे शेटे यांनी पुरावे दिले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर