शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलप्रश्नी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By admin | Updated: May 21, 2017 00:43 IST

मैदाने आठवड्यात उपलब्ध करून द्या : गुडघाभर गवतातून विभागीय आयुक्तांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर उगवलेले गुडघाभर गवत, खुरटी झाडे यातून प्रत्यक्ष मार्ग काढत संपूर्ण संकुलाची शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे गेले नसून, त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची जागीच कानउघाडणी केली. किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे पूर्ण करून ही क्रीडांगणे येत्या आठ दिवसांत खेळासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशा सक्त सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी विभागीय क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या ठिकाणी असणारे फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खो मैदान, तसेच शूटिंग रेंज, रनिंग ट्रॅक, आदींच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारांकडे चौकशी केली. संपूर्ण विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रथम कामावर देखरेख करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नाराजी व्यक्त केली. जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडांगणे तयार असली तरीही फुटबॉल, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खोची क्रीडांगणे, शूटिंग रेंज यांची काही किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून ही क्रीडांगणे खेळाडूंच्या सुविधेसाठी त्वरित उपलब्ध करून द्या, असे विभागीय आयुक्त दळवी यांनी फटकारले. क्रीडा संकुलात वाढलेले गवत काढा, सर्व मैदानांची व्यवस्थित देखभाल करा, अशाही सूचना बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संकुलाची परिस्थिती पाहता क्रीडा उपसंचालक आणि जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शुटिंग रेंजचे काम पूर्ण झाले असले तरीही तेथे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे सुनावले. दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही नियुक्त करण्याचे त्यांनी यावेळी आदेश दिले. हे काय... स्विमिंग टँक?संकुलातील जलतरण तलाव पाहून त्यांनी ‘हे काय... स्विमिंग टँक?’ असा प्रश्न उपस्थित केला. तेथे उगवलेले गवत, खुरटी झाडे पाहून त्यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येथे असणाऱ्या अपूर्ण कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.गेट कुठायं... : संकुलाची पाहणी करताना दळवी यांनी प्रथम क्रीडा संकुलाचे गेट कुठायं? असा अधिकारी, ठेकेदारांना प्रश्न करून प्रवेशद्वारानजीक कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याबाबत खंत व्यक्त केली.